काल रविवारी 5 नोव्हेंबर रोजी मुग्धा आणि प्रथमेशच्या साखरपुड्याचा सोहळा पार पडला. अतिशय साधेपणाने आणि मोजक्या नातेवाईक मित्रमंडळींच्या समवेत त्यांचा हा साखरपुडा संपन्न झाला. ना कुठला जास्तीचा मेकअप , भरजरी साड्या आणि नाही कुठला गाजावाजा यामुळेच त्यांचा हा सोहळ्यातील साधेपणा चाहत्यांना विशेष भावला. साधी नारंगी लाल रंगाची साडी नेसलेली मुग्धा त्या पेहरावात सुद्धा खूपच सुंदर दिसत होती. तर प्रथमेशने देखील नेहमीप्रमाणेच एक लाल रंगाचा साधा कुर्ता परिधान केला होता. गावच्या कुशीत आणि निसर्गाच्या सानिध्यात त्यांचा हा साखरपुडा संपन्न झाला.या साखरपुड्या नंतर दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकताना पाहायला मिळणार आहेत.