प्रयोगाला येणारे रसिकही आपापले अंदाज बांधत नाटकाला येत असतात, त्यामुळे धम्माल,
धमासान तसेच पैसा वसूल करणारे नाटक असा अंदाज घेऊन जर हे नाटक पाहायला जाणार असाल, तर तुमचा अंदाज सार्थकी लावणारे हे नाटक आहे. 'अंदाज' या संकल्पनेवर आधारित असलेल्या या घरंदाज नाटकाचे लेखन राजेश कोळंबकर यांनी केले असून, धम्माल दिग्दर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या संतोष पवारचे दिग्दर्शन त्याला लाभले आहे, शिवाय संतोषने यात अभिनयदेखील केला असून. त्याच्यासोबतीला माधवी गोगटे ही अनुभवी अभिनेत्री पुन्हा एकदा रंगभूमीवर हास्यमैफल रंगवण्यास सज्ज झाली आहे. त्यांच्यासोब्तीला 'कन्यादान' या मालिकेतून नावारूपास आलेली सर्वांची लाडकी अभिनेत्री मधुरा देशपांडे यात झळकणार असून, अक्षय केळकर हा देखणा चेहरादेखील या नाटकाद्वारे मराठी रंगभूमीवर पदार्पण करीत आहे.