पुन्हा अनिकेत-प्रियदर्शन एकत्र

सोमवार, 29 ऑक्टोबर 2018 (17:24 IST)
अनिकेत विश्वासराव आणि प्रियदर्शन जाधव पुन्हा एकत्र रुपेरी झळकणार आहेत. या दोघांची जोडगोळी 'माझ्या बायकोचा प्रियकर' या सिनेमात धमाल करण्यास सज्ज झाली आहे. माझ्या बायकोचा प्रियकर' या सिनेमाच्या माध्यमातून हे दोघे पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहेत. हिंदी व मराठी अशा दोन्ही सिनेसृष्टीमध्ये अनेक अभिनेत्यांच्या जोड्या हिट ठरल्या आहेत. अनिकेत-प्रियदर्शन अशी नवीन जोडगोळी मराठी सिनेसृष्टीला मिळाली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन राजीव एस. रुईया यांनी केले आहे. अनिकेत-प्रियदर्शनसोबतच या सिनेमात भाग्यश्री मोटे, प्रिया गमरे, अंशुमन विचारे, भारत गणेशपुरे, पदम सिंग, सुरेश पिल्लई, स्वाती पानसरे, अनुपम ताकमोघे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. राजकला मुव्हीज अँड बाबा मोशन पिक्चर्स प्रा. लि.या बॅनरखाली निर्मिती करण्यात आलेला हा सिनेमा २३ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. दीपक रुईया, राजेंद्र गोयंका, प्रदीप के शर्मा, अनिता शर्मा, धवल जयंतीलाल गाडा, अक्षय जंयतीलाल गाडा हे निर्माते आहेत. तर रेश्मा कडाकिया, कौशल कांतीलाल गाडा, निरज गाडा हे सहनिर्माते आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती