ह्रता दुर्गुळेने बॉयफ्रेंड प्रतीक शाह याच्याशी शुक्रवारी, 24 डिसेंबर 2021 रोजी साखरपुडा केला होता. हृता दुर्गुळेने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण रिलेशनशिपमध्ये असल्याची घोषणा केली होती. छोट्या पडद्यावरील 'फुलपाखरू' आणि 'मन उडू उडू झालं' मालिकांमधून हृता दुर्गुळे घराघरात लोकप्रिय झाली आहे.
प्रतिक हा हिंदी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री मुग्धा शाहचा मुलगा आहे. त्यांनी अनेक लोकप्रिय हिंदी मालिका दिग्दर्शित केल्या आहेत. प्रतीकने तेरी मेरी इक जिंदादी, बेहद 2, बहू बेगम, कुछ रंग प्यार के ऐसे भी, एक दीवाना था यांसारख्या मालिका दिग्दर्शित केल्या आहेत.