आकाशचे वडील गवंडी काम करतात, आई गृहिणी आहे. त्याच्या घरची परिस्थिती तशी साधीच आहे. आकाशला एक भाऊ आणि दोन बहिणी आहेत. दोन्ही बहिणींचं लग्न झालंय. आकाशचे दहावीपर्यंतच शिक्षण पुण्यातच झाले आहे. सुरुवातीपासून त्याला पहेलवान व्हायचं होतं.
पुण्यातील श्री शिवाजी विद्यामंदिर अँड ज्युनियर कॉलेज, औंध येथून त्याने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. आकाश आता बाहेरुन एम.एचे शिक्षण घेतोय. विकीपीडियाने आकाशच्या नावाची नोंद घेत त्याचे विकीपीडिया पेज तयार केले आहे. यावर आकाशची खासगी माहिती उपलब्ध आहे.