इगतपुरी: तालुक्यातील घोटी ह्या संपुर्ण तालुक्याची मोठ्या बाजारपेठेत सातत्याने वर्दळ असते. अंदाजे लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल या ठिकाणी होते. या उलाढालीतील एक प्रमुख दुवा आर्थिक व्यवहार करणाऱ्या बँका असतात. यात स्टेट बँक ही महत्त्वाची आहे. मात्र जुन महिन्याच्या प्रारंभीच या बॅंकेच्या इमारतीचे भाडे थकल्याने टाळे ठोकण्याची वेळ आली आहे. मात्र यामुळे रणरणत्या उन्हात शेकडो नागरिकाचीं प्रचंड परवड झाली आहे.
हा प्रकार अचानक घडल्याने तालुक्यातील कानाकोपऱ्यातुन आलेल्या नागरिकाचीं प्रचंड परवड झाली आहे. त्यामुळे अनेकाना निराशेपोटी परतावे लागले आहे. कुणाला बाजारासाठी, कुणाला दवाखान्यासाठी तर अनेकानां विविध कारणासाठी पैसे हवे होते. मात्र आलेले नागरिक आता कुणाकडे हात पसरावे या विवंचनेत परत गेले आहेत.
प्रस्तुत प्रतिनिधीने शाखा व्यवस्थापकाशी संपर्क केला असता संपर्क झाला नाही. नाशिक येथील मुख्य कार्यालयात दुरध्वनी उचलला जात नाही. बँकेतील इतर कर्मचारी अळीमिळी गुपचिळी करत मौन धरुन होते. तर काहीजण जागा मालकाची विनवणी करत होते. आपण टाकेद येथुन पेंन्शनचे पैसे काढण्यासाठी आलो होतो. घरी काही बाजार, गोळया औषधे न्यायची होती. पण आता नाईलाज आहे. परत जावे लागणार आहे असे मत जेष्ठ नागरिक पेन्शनधारक रामदास बांबळे यांनी व्यक्त केले.