आशियातील श्रीमंत मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने 5 सप्टेंबर 2016 रोजी देशाच्या दूरसंचार क्षेत्रात पाऊल ठेवले. देशात मोबाईल सर्व्हिसेस टेलिकॉम सेक्टरला 25 वर्षे झाली आणि पहिल्या 400 दशलक्ष ग्राहकांना जोडण्यासाठी 14 वर्षांचा कालावधी लागला, तर जिओने हे काम 4 वर्षांपेक्षा कमी कालावधीत केले.
मोबाइल ग्राहकांच्या बाबतीत, दुसरा क्रमांक असलेल्या भारती एअरटेलनेही जुलैमध्ये कित्येक महिन्यांनंतर नवीन ग्राहक जोडले. 32 लाख 60 हजार 536 नवीन ग्राहकांसह 31 कोटी 99 लाख 32 हजार 20 ग्राहकांची कंपनी बनली. भारती एअरटेलचा बाजाराचा वाटा 27.96 टक्के आहे.