कंपनीने पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता एसएमएस व ईमेलवर मिळणार आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटना (इपीएफओ) आता एसएमएस आणि ई-मेलद्वारे अलर्ट देणार आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारातून पीएफची रक्कम कापूनही पीएफ जमा न करणाऱ्यांना चाप बसणार आहे.
कामगार मंत्रालयाने याविषयी म्हटलं की, इपीएफओने सदस्यांसाठी सुरू केलेल्या नव्या सुविधेतून त्यांना त्यांच्या खात्यातील पीएफच्या रक्कमेची माहिती एका एसएमएसवर किंवा मिस्ड कॉलवर मिळणार आहे. याशिवाय सदस्य इ-पासबुकही पाहता येईल.