पेट्रोल पुन्हा 30 पैशांनी महागले

शनिवार, 17 जुलै 2021 (10:04 IST)
शनिवारी देशात पेट्रोलच्या दरात 30 पैशांची वाढ झाली असून,राजधानी दिल्लीसह देशभरात त्याची किंमत नव्या विक्रमाच्या पातळीवर गेली.मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 112 रुपयांच्या पुढे गेले आहेत.डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
 
मध्य प्रदेशच्या अनुपपूर,अलिराजपूर,बालाघाट,श्योपुर,शहडोल,रीवा यासह अनेक शहरांमध्ये पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 112रुपयांच्या पुढे गेली आहे. त्याचप्रमाणे राजस्थानमधील श्री गंगानगर,बीकानेर आणि हनुमानगडमध्ये पेट्रोल 112 रुपये प्रति लीटर महाग झाले आहे.
 
शनिवारी दिल्लीत वाढ झाल्यानंतर पेट्रोलची किंमत 101.84 रुपये झाली आणि मुंबईत ती 107.83 रुपये प्रतिलिटर झाली.चेन्नईत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 102.49 रुपये आहे तर कोलकातामध्ये त्याची किंमत प्रतिलिटर 102.08 रुपये आहे.
 
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचे दररोज पुनरावलोकन केले जाते आणि त्या आधारे नवीन दर रोज सकाळी 6 पासून लागू केल्या जातात.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती