जगातील पहिला रोलेबल टीव्ही, पोस्टरसारखे रोल करून बॉक्समध्ये ठेवता येईल

गुरूवार, 10 जानेवारी 2019 (12:38 IST)
लास वेगासमध्ये आयोजित कन्झ्यूमर इलेक्ट्रॉनिक शो सीईएस 2019 मध्ये एका पेक्षा एक इलेक्ट्रॉनिक उत्पादने सादर केले जात आहे. एलजीने ओएलईडी टीव्ही-आर सीरीज अंतर्गत जगातील पहिला रोलेबल टीव्ही सादर केला आहे. हा 65 इंच टीव्ही जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपण पाहू शकता, आणि टीव्ही लपवू देखील शकता.
 
याला पोस्टरसारखे बॉक्समध्ये रोल करून देखील ठेवू शकता. एलजी नुसार या टीव्हीची विक्री या वर्षीच सुरू केली जाईल. तथापि या टीव्हीची किंमत अजून माहीत पडलेली नाही. कंपनीच्या मते, हा टीव्ही तीन मोडमध्ये
असेल. फुल व्यूह मोडमध्ये ओएलईडी टीव्ही पूर्णपणे दृश्यमान असेल. लाइन व्यूह मोडमध्ये टीव्हीचा अधिकांश भाग एक स्पीकर बॉक्समध्ये राहील आणि त्यापैकी केवळ एक लहान भाग दृश्यमान असेल. यात म्युझिक, क्लॉक, फ्रेम, होम डॅशबोर्ड आणि मूडसारखे चिन्ह दिसतील. जिरो व्यूह मोडमध्ये टीव्ही पूर्णपणे स्पीकर बॉक्समध्ये घातला येईल आणि त्याचा कोणताही भाग दिसणार नाही. या मोडमध्ये संगीत किंवा ऑडिओ सामग्री ऐकली जाऊ शकेल.
 
ऍमेझॉन अॅलेक्सासाठी लवकरच टीव्हीला एक सपोर्ट उपलब्ध करवला जाईल. यानंतर रिमोट कंट्रोलवरील प्राइम व्हिडिओ बटण दाबून वापरकर्ते अॅलेक्साशी बोलण्यास देखील सक्षम असतील. कंपनी टीव्हीवर मिररिंग वैशिष्ट्य देण्यासाठी ऍपल सह भागीदारी करून चुकली आहे आणी लवकरच या रोलेबल टीव्ही सेट्ससाठी अॅप्पलकडून एअरप्ले 2 सपोर्ट रिलीज केला जाईल. जेणेकरून वापरकर्ते या टीव्हीद्वारे त्यांच्या ऍपल डिव्हाइसेस ऑपरेट करण्यास सक्षम होतील.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती