खुशखबरी: बँक मधून 50 हजारापेक्षा जास्त पैशांचे घेवाण देवाण आता आधार कार्डद्वारे करू शकता

सोमवार, 8 जुलै 2019 (15:52 IST)
ही बातमी त्या लोकांना मदत करेल ज्यांच्याजवळ पॅन कार्ड नाही आहे आणि त्यांना बँकेतून 50 हजारांपेक्षा जास्त रुपयांचे घेवाण देवाण करायचे असेल. जर कोणा व्यक्तीकडे पॅनकार्ड नसेल आणि त्याला बँकेकडून 50 हजार रुपयांपेक्षा जास्त देवाण घेवाण करायचे असेल तर तो आधार कार्डचा वापर करू शकतो. जेथे पॅनकार्ड अनिवार्य होते तेथे आता आधार नंबराचा वापर केला जाऊ शकतो, खास करून इनकम टॅक्स रिर्टन फाइल करताना व्यक्ती आता आधार नंबराचा प्रयोग करू शकतो.  
 
पॅन आणि आधार कार्ड बनले एक दुसर्‍यांचे विकल्प  
सामान्य जनतेसाठी या सुविधेची घोषणा वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांनी शुक्रवारी बजेट सादर करताना केली. त्यांनी देशातील ग्राहकांच्या सोयींसाठी बर्‍याच नियमांना सोपे करून पॅन कार्डच्या जागेवर आधारचे विकल्प देण्याची बाब सांगितली आहे. आतापर्यंत ज्या जागेवर फक्त पॅनकार्डला अनिवार्य मानले जाते होते, आता त्या प्रत्येक जागेवर ग्राहकांना आधार नंबरचा वापर करण्याचे ऑप्शन मिळेल.  
बँका करतील त्यांचे सिस्टम अपडेट 
या घोषणेनंतर राजस्व सचिव अजय भूषण पांडे यांनी बँकांना आपले सिस्टम अपग्रेड करण्यासाठी सांगितले आहे ज्याने जेथे जेथे पॅनकार्ड अनिवार्य होते, तेथे ग्राहक आपल्या आधार नंबराचा प्रयोग करू शकतील. सध्या जर ग्राहक बँकेकडून 50 हजार रुपयांपेक्षा जास्तची रक्कम काढतात किंवा जमा करतात तर त्यासाठी त्यांच्याजवळ  पॅन कार्ड होणे आवश्यक आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे वर्तमानात 22 कोटी पॅन कार्ड धारकच आधाराशी जुळलेल आहे, तसेच 120 कोटींपेक्षा जास्त लोकांजवळ आधार कार्ड आहे. जर कोणा व्यक्तीकडे आधार कार्ड आहे पण पॅनकार्ड नाही आहे तर तो आधार कार्डच्या मदतीने आपला पॅनकार्ड बनवू शकतो आणि नंतर त्याचा वापर करू शकतो. अशा स्थितीत लोकांसाठी सरळ आधार कार्डचा वापर करणे सोपे आणि सुविधाजनक होईल.  
 
पूर्णपणे हटले नाही आहे पॅनकार्ड  
राजस्व सचिव यांनी सांगितले की बँकिंग सिस्टममध्ये पॅनकार्डचा प्रयोग पूर्णपणे संपणार नाही बलकी ते याच्या अनिवार्यतेला संपवून आधार कार्डला एक विकल्पच्या रूपात आणण्यास इच्छुक आहे.  
 
एनआरआयला लवकर मिळेल आधार कार्ड 
भारतीय पासपोर्ट ठेवणारे एनआरआय लोकांसाठी देशात आल्यानंतर आधार कार्ड जारी करण्यात येईल. महत्त्वाचे म्हणजे वर्तमान काळात भारतीय पासपोर्ट ठेवणारे अनिवासी भारतीयांना आधार कार्ड प्राप्त करण्यासाठी 180 दिवसांची वाट बघावी लागत होती. आता ते आपले केवायसी पूर्ण करून वित्तीय घेवाण देवाण करू शकतील.   

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती