झोपण्यापूर्वी त्वचेची काळजी घ्या

शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (11:06 IST)
जर झोपण्यापूर्वी त्वचेची काळजी घेतली तर आपल्या निश्चितच महागड्या ब्युटी प्रोडक्टचा आधार घेण्याची गरज कधीच भासणार नाही. रात्रीच्या वेळेस आपल्या त्वचेच्या पेशी दुरुस्त होतात म्हणून झोपण्यापूर्वी आपण या टिप्स अमलात आणा-
 
मेकअप काढून चेहरा स्वच्छ करा
मेकअप लावून झोपल्याने मुरुमांची समस्या उद्भवते. झोपण्यापूर्वी मेकअप काढणं आवश्यक आहे आपण मेकअप करत नसला तरी झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करून घ्या. कारण दिवसभरात त्वचेवर धूळ-मातीचे कण आणि तेल साचण्यास सुरुवात होते. यामुळे चेहऱ्याच्या त्वचेवरील छिद्रे बंद होतात.
 
सीरम लावा
पण ते लावण्यापूर्वी त्वचेमध्ये ओलावा टिकवून राहावा यासाठी सीरम लावणे योग्य ठरेल. आपण आपल्या वयानुसार अँटी एजिंग सीरमचाही वापर करू शकता. आपण एलोवेरा जेल देखील वापरु शकता.
 
नाइट क्रिम
चेहर्‍यावरील सुरकुत्या आणि डाग घालवण्यासाठी नाइट क्रीम वापरा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नाइट क्रीम कशा प्रकारे अप्लाय करावी जाणून घ्या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती