केस गळती थांबवते बडीशेप, जाणून घ्या कसा करावा उपयोग

मंगळवार, 30 एप्रिल 2024 (16:29 IST)
बडीशेप ही केसांना पोषक तत्व प्रदान करते. तसेच बडीशेप एक सुगंधित मसाला आहे. ज्याचा उपयोग अनेक वर्षांपासून पारंपरिक औषधांमध्ये केला जातो. यामध्ये औषधीय गुण असतात. बडीशेपमध्ये केस गळती थांबवण्याची क्षमता असते. बडीशेपमध्ये अनेक पोषक तत्वे असतात. जे केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. जर तुम्ही केसांचे गळणे किंवा कोरडेपणा या समस्यांमुळे चिंतीत असाल तर, बडीशेपचा उपयोग नक्कीच करू शकतात. 
 
*केसांना बडीशेप लावण्याचे फायदे 
बडीशेपमध्ये व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन E, आयरन, पोटॅशियम, कॅल्शियम, अँटिइंफ्लेमेटरी व अँटीफंगल गुण असतात. जे केसांसाठी महत्वपूर्ण प्रोटीन प्रदान करतात. तसेच मुक्त कणांपासून होणाऱ्या नुकसान पासून वाचवतात, ऑक्सिजन, पोषकतत्वे पुरवतात, तसेच केसांना मजबूत आणि आरोग्यदायी बनवतात. केस गळती थांबवून केसांची वाढ होते.
 
*बडीशेपचा उपयोग कसा करावा 
1. बडीशेपचे तेल- बडीशेपच्या तेलाला नारळाच्या तेलात मिक्स करून टाळूवर लावावे. हे तेल केसगळती थांबवते. 
 
2. बडीशेपचे पाणी- बडीशेपच्या बिया पाण्यात उकळून त्याचे पाणी बनवावे. ह्या पाण्याने केस धुवावे. यामुळे केस मजबूत होतात व केसगळती बंद होते. 
 
3. बडीशेपची पेस्ट- बडीशेपच्या बिया बारीक करून त्याची पेस्ट बनवावी. ही पेस्ट लावून 30 मिनिट तशीच राहू द्यावी. मग गरम पाण्याने केस धुवावे. यामुळे केस गळणे बंद होते व वाढ होते. 
 
*सावधानी 
बडीशेपचा उपयोग सामान्यपणे केसांसाठी सुरक्षित मानला जातो. काही लोकांना बडीशेपची एलर्जी असते. गर्भवती महिलांनी बडीशेपचा उपयोग कारण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती