काय सांगता, तमालपत्र वापरून नैसर्गिक चमक मिळवता येते
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020 (12:59 IST)
तमालपत्राचा वापर आपण निव्वळ आपल्या अन्नात घालण्यासाठी नव्हे तर आपल्या त्वचे आणि केसांच्या फायद्यासाठी देखील करू शकतो. कसे काय, तर जाणून घेऊ या तमालपत्राने आपलं सौंदर्य कसे वाढवणार ?
1 चेहऱ्यावर डाग, पुळ्या, पुरळ, मुरूम असल्यास तमालपत्र खूप फायदेशीर आहे. तमालपत्राचे लेप किंवा तमालपत्र पाण्यात उकळून त्या पाण्याने चेहरा धुतल्याने चेहरा स्वच्छ होतो आणि डाग नाहीसे होतात.
2 तमालपत्राचं पाणी सूर्याच्या किरणांनी प्रभावित झालेल्या त्वचेला देखील बरे करण्यास मदत करतं आणि त्वचेचा रंग देखील एक सारखा ठेवण्यास मदत करतं.
3 केसांना कोमल आणि मऊ आणि चमकदार ठेवण्यास तमालपत्राचा वापर फायदेशीर आणि प्रभावी आहे. आपली इच्छा असल्यास ह्याला तेलात घालून तेल केसांच्या मुळात लावू शकता, किंवा याचा पाण्याने केस धुऊ शकता.
4 तमालपत्राचा लेप बनवून केसात लावल्यानं कोंडा नाहीसा होतो. या लेपाला दह्यात मिसळून लावू शकता, जेणे करून डोक्याची त्वचा ओलसर राहावी आणि पोषण देखील मिळेल.
5 तमालपत्र कोरडं केल्यावर आणि त्याची भुकटीला मंजन प्रमाणे वापरल्यानं, दात पांढरे करण्यासाठी आणि चमक टिकवून ठेवण्यासाठी प्रभावी असतं. आपली इच्छा असल्यास आपण आठवड्यातून एकदा हे वापरू शकता.