सप्टेंबर 2020 महिन्यातील राशी भविष्य

सोमवार, 31 ऑगस्ट 2020 (17:37 IST)
वृषभ : लक्षात असू द्या वाणीच मित्र आणि शत्रू बनवते, म्हणून तिचा वापर विचारांती करा. स्त्री वर्गासाठी हा महिना फारच शुभ आहे. शत्रुच्या गुप्त कारस्थानांपासून सावध राहण्याची गरज आहे. फार परिश्रम करावे लागतील. तब्येतीची काळजी घ्या. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धांचे निकाल उत्तम असतील. मित्रांसोबत मिळून नव्या कामाची सुरुवात करू शकता. नोकरीतही आपल्याला पदोन्नती मिळू शकते. 
 
मिथुन : ही वेळ निव्वळ योजना आखण्याची नाही तर त्यावर अंमलबजावणी करण्याची आहे. अचानक एखाद्या दूरवरच्या प्रवासाला जाऊ शकता. जीवनात नवा आनंद प्राप्त होणारच आहे, खुल्या मनाने त्याचे स्वागत करा. एकाग्रचित्ताने काम करा, यश नक्की मिळेल. शत्रू तुमचे नुकसान करण्यासाठी टपून बसले आहेत, सावध राहा. परिवारात नवा आनंद येणार आहे. एकुणच हा महिना चांगलेच फळ देईल.
 
कर्क : कुटूबीयांना नाराज करू नका, नाहीतर होत असलेली कामे होणार नाहीत. एखाद्या गरजूला मदत केल्यास तुमच्या मनाला सुख-शांती लाभेल. स्पर्धेची तयारी करत असाल तर यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. सांधेदुखी होऊ शकते. व्यापारात नफ्यात घट होईल. मित्रांचे वागणे साहाय्यकारी ठरेल. पत्नीचे स्वास्थ्य चिंताजनक राहू शकेल. दीर्घ प्रवास थकवणारे ठरतील. हवेत गप्पा मारणे ठीक नाही. 
ALSO READ 
सप्टेंबरमध्ये राहूचे राशि परिवर्तन केल्याने ते कोणत्या राशीसाठी फायदेशीर ठरेल जाणून घ्या...
साप्ताहिक राशीफल 30 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2020
सिंह : शत्रुंची नजर तुमच्या सफलतेवर आहे आणि तुमच्या क्रोधामुळे त्यांचे काम सोपे होऊ शकेल. गुप्त गोष्टी कोणालाही सांगणे टाळा. अपत्याची चिंता सतावेल.कौटुंबिक जीवनात उलथा-पालथ होऊ शकेल, सावध राहा. यासोबतच प्रापंचिक आणि कौटुंबिक पातळीवरही समस्यांशी चार हात करावे लागू शकतील. कुटुंबातील सदस्यांसोबत कुठल्याही वादात पडणे टाळा. 
वस्तुप्रमाणे इतरांच्या काही गोष्टी मुळीच वापरू नका
कन्या : राजनैतिक संबंधांचा लाभ होईल. व्यापाराच्या नव्या योजना लाभ देतील. शत्रू तुम्हाला त्रास देण्याची संधी शोधत आहेत, दक्ष राहा. आई-वडीलांकडून साहाय्य मिळेल. अपत्याचे स्वास्थ्य चिंतेची बाब ठरेल. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात लागणार नाही. नव्या जबाबदाया तुमच्यावर मानसिक दबाव टाकू शकतात. महिनाअखेरीस काही पाहुणे तुमच्या घरी येऊ शकतात.
 
तूळ : एखाद्या पारिवारिक कार्यक्रमात जाणे होऊ शकतो. कोणीतरी आपल्यावर मोठी आस बाळगून आहे, कृपया त्या व्यक्तीला निराश करू नका. अपत्यांचे वागणे प्रसन्नता देईल. जीवनात उत्साह आणि आशा कायम राहील. २० तारखेनंतर काही आर्थिक समस्या येऊ शकतात. शत्रू आपले नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. मित्रांसोबत मिळून नव्या कामाची सुरुवात करू शकता. नोकरीतही आपल्याला पदोन्नती मिळू शकते.
 
वृश्चिक : महिना लाभदायक आहे. नव्या योजना बनवाल. मित्र प्रत्येक अडचणीत तुमची साथ देतील. सासरच्या लोकांकडून साहाय्य मिळेल. आर्थिक बाजू ठीक राहील. कम्प्यूटर व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी वेळ चांगली असरणार आहे. शत्रूंची प्रत्येक चाल अयशस्वी ठरेल. वाहन चालवताना अति-दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. मद्यपान करताना संयम ठेवा. डॉक्टरकडे जाणे होऊ शकेल.
फेंगशुई : या टिप्सचा वापर करून मिळवा पसंतीचा जोडीदार
धनु : तुम्ही आपल्या अपत्याबाबत फार दिवसांपाहून त्रस्त आहात त्या समस्येचा या महिन्यात अंत होईल. भविष्यात होणाऱ्या मांगलिक कार्यांचे योग जुळत आहेत. कायदेशीर अडचणींवर तोडगा मिळेल. राजनैतिक संबंधांचा फायदा होऊ शकतो. जोडीदाराचे पूर्ण साहाय्य प्राप्त होईल. स्वास्थ्य उत्तम राहील, जोडीदार आणि मित्रांचा सहयोग प्राप्त होईल. परिवारात सुख-शांती राहील. 
 
मकर : काळ बदलत आहे, पण लक्षात असू द्या की प्रगतीच्या झाडावर फळं मेहनतीचे पाणी पाजल्यावरच येतात. मित्र तुमच्यासाठी सावलीसारखे काम करतील. नवे वाहन तुमच्या आनंदात भर टाकेल. स्त्रियांनी आणि वृद्धांनी आरोग्याची काळजी घ्यावी. जोडीदार पूर्ण सहकार्य करेल. महिना-अखेरीस परिस्थिती सामान्य होईल. व्यापारी वर्गाला फायदा होण्याची आशा आहे.
 
कुंभ : हा महिना येणाऱ्या जीवनाची दिशा ठरवणारा आहे. विचार करून निर्णय घेणे योग्य होईल. नवा व्यवसाय सुरू करताना मित्रांची मदत घेतल्याने फायदा होईल. स्त्रियांसाठी खूप चांगली वेळ आहे. अपत्यप्राप्तीचा सुखद योग आहे. अधिकारींशी संबंधांचा फायदा होईल. नोकरदार लोकांसाठी सामान्य वेळ आहे. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत पुढे जाण्याची आशा आहे. आरोग्याप्रती सजग राहा. इतरांच्या प्रकरणात उगीचच नाक खुपसू नका. हा महिना तुमच्यासाठी मिळता-जुळता असणार आहे. 
 
मीन : तुमच्या राहण्या-वागण्या-बोलण्यात स्पष्ट बदल दिसून येतील. तुमच्या जीवनशैलीत आलेल्या सकारात्मक बदलाने सगळे अवाक् होतील. कामाच्या ठीकाणी तुमच्यावर नवी जवाबदारी सोपवली जाऊ शकते. तुमच्या या पदोन्नतीवर काहीजण ईर्ष्याही करतील आणि त्याच्याशी तुमचे भांडणही होऊ शकतो. चांगल्या परिणामांची गती कायम ठेवण्यासाठी तुम्हाला अपार मेहनत करावी लागेल. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती