सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा जोरावर आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेत्तृत्वाखाली मराठा समाज एकत्रित होऊन मराठा आरक्षणाची मागणी करत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला निर्णय घेण्यासाठी चा दिलेला वेळ संपत आला आहे. राज्यात मराठा आरक्षणाची मागणी करत तरुण आत्महत्या करत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तरुणांना कोणतेही टोकाचे पाऊल न घेण्याचे आवाहन केले आहे.
ओंकार आनंदराव बावणे असे या तरुणाचे नाव आहे. त्याने रविवारी संध्याकाळच्या सुमारास गावाशेजारील जंगली पीर जवळच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. माझे आईवडील मोलमजुरी करून आम्हाला शिकवत होते. त्यांची परिस्थती मी पाहू शकत नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही म्हणून मी आत्महत्या करत आहे. असे सुसाईड नोट मध्ये लिहून ठेवले आहे.