मकर संक्रांतीच्या शुभेच्छा Makar Sankranti Wishes

गुरूवार, 13 जानेवारी 2022 (09:27 IST)
तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला,
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !
 
या संक्रांतीच्या दिवशी तुमच्या आयुष्यात 
उगवता सूर्य हा आशेची किरणं घेऊन येवो, 
गगनात आनंद मावणार नाही 
अशा स्वरूपात तुमच्या आयुष्याचा पतंग उडो 
हीच सदिच्छा 
 
कणभर तिळ मनभर प्रेम
गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा.
 
तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडु…
मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..!
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
 
तुमच्या स्वप्नांना 
पतंगाप्रमाणेच भरारी मिळू दे 
ही इच्छा. 
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा 
 
तिळगुळ घ्या गोड गोड बोला!!
मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..
 
हलव्याचे दागिने, काळी साडी…
अखंड राहो तुमची जोडी
हीच शिभेच्छा, संक्रांत वर्ष दिनी…
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…
 
आभाळात पतंग दिसू लागल्यावर 
मन झालं उडू उडू, 
कडू आठवणी विसरून 
तिळाचा गोडवा जवळ करू, मकर संक्रांती शुभेच्छा. 
 
वर्ष सरले डिसेंबर गेला,
हर्ष घेऊनी जानेवारी आला,
निसर्ग सारा दवाने ओला,
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या संदेशरुपी गोड गोड शुभेच्छा…
 
आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची
कणभर तीळ, मनभर प्रेम
गुळाचा गोडवा सोबत ऋणानुबंध वाढवा
तिळगुळ घ्या गोडगोड बोला!
 
एक तिळ रुसला, फुगला
रडत रडत गुळाच्या पाकात पडला
खटकन हसलाएक तिळ रुसला, फुगला
रडत रडत गुळाच्या पाकात पडला
खटकन हसला हातावर येताच बोलू लागला
तिळगुळ घ्या गोड गोड बोला.
 
गगनात उंच उडता पतंग
संथ हवेची त्याला साथ
मैत्रीचा हा नाजूक बंध
नाते अपुले राहो अखंड
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…
 
गोड गोड शब्दांचा फुलवा पाक,
स्नेहांचे तिळ मिळवा त्यात,
तिळावर फुलेल पाकाचा काटा,
प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा..
 
कणभर तीळ मनभर प्रेम
गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…
मकर संक्रांतीच्या आपणास व
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा 
 
गोड गुळाला भेटला तीळ, 
उडाले पतंग रमले जीव, 
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
 
तिळाची उब लाभो तुम्हाला,
गुळाचा गोड़वा येवो जीवनाला,
यशाची पतंग उड़ो गगना वरती,
तुम्हास अणि तुमच्या परिवारास.
 
शरीरात मस्ती, मनात उमेद, 
चला रंगवूया आकाश, सगळे येऊनी साथ, 
उडवूया पतंग… मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा. 
 
कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो
पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो
असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा
आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या…
मकरसंक्राती हादिक शुभेच्छा
तिळगुळ घ्या गोड बोला…
 
नाते अपुले
हळुवार जपायचे…
तिळगुळ हलव्याच्या गोडी सोबत
अधिकाधिक दॄढ करायचे…
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…
 
शेंगदाण्याचा सुंगध गुळाचा गोडवा, 
मक्याची रोटी आणि सरसोंचं साग, 
मनात आनंद आणि प्रेमाचा दोघांचा 
होऊ द्या मिलाप, मकर संक्राति शुभेच्छा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती