गुळात भाजून वाटलेले तीळ, भाजलेले तीळ, दाण्याचे कूट, तूप, दूध, व वेलदोड्याची पूड घालावी. सर्व मिसळून गोळा तयार करावा. तूप लावलेल्या पोळपाटावर वरील मिश्रणाचा गोळा ठेऊन तूप लावलेल्या लाटण्याने अंदाजे अर्धा से. मी. जाड लाटून घ्यावं. वरून खोबरे पसरा व परत एकदा लाटणे फिरवावं. आवडीच्या आकाराचे काप करून घ्यावे.