Maha Shivratri महामृत्युंजय मंत्राचे चमत्कार, जाणून घ्या नियम
सोमवार, 28 फेब्रुवारी 2022 (19:36 IST)
महाशिवरात्रीच्या दिवशी शिव आराधनाचे विशेष महत्त्व आहे. शिव आराधना करताना अभिषेक करण्याचं जितकं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व महामृत्युंजय मंत्राचं देखील आहे. महामृत्युंजय मंत्राविना शिव आराधना अपूर्ण आहे.
महाशिवरात्रिला महामृत्युंजय मंत्राचे पारायण व पुरश्चरण याने विशेष लाभ प्राप्त होतं. जाणून घ्या महामृत्युंजय मंत्राचे पुरश्चरण कसे केलं जातं-
पुरश्चरणाचे पाच अंग असतात.
1. जप 2. हवन 3. तरपण 4. मार्जन 5. ब्राह्मण भोज
पुरश्चरणामध्ये जप संख्या निर्धारित मंत्राच्या अक्षरांच्या संख्येवर अवलंबून असते. यात "ॐ" आणि "नम:" मोजत नाहीत. जप संख्या निश्चित झाल्यानंतर जपाचे दशांश हवन, हवनाचे दशांश तरपण, तर्पणाचे दशांश मार्जन आणि मार्जनाचे दशांश ब्राह्मण भोज केल्याने पुरश्चरण पूर्ण होतं.
-पारायण हेतू निम्न महामृत्युंजय मंत्राचे यथाशक्ति जप करावे-
- सर्वत्र रक्षा हेतू निम्न महामृत्युंजय मंत्राचे यथाशक्ति जप करावे-
"ॐ जूं स: (अमुकं) पालय पालय स: जूं ॐ"
(यजमान किंवा इतर एखाद्या रक्षा हेतू मंत्र जपत असल्यास "अमुक" या जागी व्यक्तीचे नाव घ्यावे. स्वत:च्या रक्षा हेतू मंत्र जपत असल्यास "अमुक" या जागी "मम्" असे उद्बोधन असावे.)
-आजारापासून मुक्तीसाठी निम्न महामृत्युंजय मंत्राचे यथाशक्ति जप करावे