महाराष्ट्राचे पैठण गुंतते जेथे मन .....

गुरूवार, 12 मार्च 2020 (18:24 IST)
महाराष्ट्रातील औरंगाबाद पासून 50 किमी. च्या अंतरावर पैठण तालुक्याचे ठिकाण आहे. महाराष्ट्राच्या गोदावरीच्या काठावर वसलेले पैठण. गोदावरी ज्याला "दक्षिण काशी "म्हणून पण ओळखले जाते. 
 
पैठण संत एकनाथांची समाधी, जायकवाडी धरण, ज्ञानेश्वर उद्यान आणि पैठणी साडी यासाठी प्रसिद्ध आहे. पैठणी हे साडीचे प्रकार आहे ह्याला पैठणी त्या गावाच्या नावावरून मिळाले आहे. या गावाचे मूळ नाव "प्रतिष्ठान". ही सातवाहन राजाची राजधानी होती. महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधरस्वामी यांचे काही काळ पैठण येथे वास्तव्यास होते. एकनाथ महाराजांची जन्म आणि कर्मभूमी दोनीही पैठणचं होती. इथे एकनाथ महाराजांचा वाडा होता. ज्याचे आता मंदिरात रूपांतरण केले गेले आहे. एकनाथ हे विठ्ठलभक्त होते. फाल्गुन वद्य षष्ठीला ज्याला नाथषष्ठी देखील म्हणतात. ही एकनाथ महाराजांची पुण्यतिथी असते. या निमित्त सहा दिवसांचा मोठा उत्सव येथे असतो. अष्टमीला गोपाळकाल्याने उत्सवाची सांगता होते.
 
गोदावरी तटी नागघाट म्हणून ठिकाण आहे. ज्ञानेश्ववरांनी ज्या रेड्याच्या मुखातून वेद वदविले त्या रेड्याची मूर्ती देखील इथे आहे. पैठणचे मुख्य रोजगाराचे साधन शेती आहे. पैठण शहराजवळ एमआयडीसी आहे पण तेथील अनेक उद्योग बंद आहे. तालुक्यातील चितेगावात व्हिडियोकॉन सारखे काही उद्योग कार्यरत आहे. त्यामुळे आता शेतीच इथला मुख्य व्यवसाय आहे.
 
पैठणचे काही प्रेक्षणीय स्थळे -
* संत एकनाथ महाराजांचे समाधिस्थान 
* संत एकनाथ महाराजांचा वाडा
* सातवाहन राजांच्या महालाच्या खाणखुणा, कोरीव खांब वगैरे असणाऱ्या या प्रासादाच्या आवारात एक विहीर आहे. या विहिरीला शालिवाहनाची विहीर म्हणतात.
* जायकवाडी धरण : गोदावरी नदीवरील जायकवाडी हे धरण पैठण जवळच आहे.
* जांभुळ बाग
* संत ज्ञानेश्वर उद्यान
* नागघाट
* लद्दू सावकाराचा वाडा
* जामा मशीद
* तीर्थ खांब
* मौलाना साहब दर्गा
* जैन मंदिर पैठण
* सातबंगला पैठणी साडी केंद्र
* वीज प्रकल्प, जुने कावसान नाथसागर धरण
* नवनाथ मंदिर, पालथी नगरी पैठण
* छत्रपती शिवाजी महाराज चौक
* मराठा क्रांती भवन (महाराष्ट्रातील पहिले क्रांती भवन
 
कसे जाणार ..?
पैठण येथे येण्यासाठी औरंगाबाद वरून अनेक वाहने उपलब्ध आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती