महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करत आहेत.
महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आज (11 मार्च) राज्याचा अर्थसंकल्प सादर करत आहेत.
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेचा विस्तार करून त्यामध्ये शेततळ्याचा समावेश करण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार शेततळ्याच्या अनुदानाच्या रकमेत 50 टक्के वाढ करण्यात येत आहे. हे अनुदान आता 75 हजार रुपये इतके असेल, अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे.
याशिवाय अजित पवार यांनी शेती, आरोग्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रासाठी निधीची घोषणा केली आहे.
शेती
20 लाख शेतकर्यांना 2022-23 मध्ये 10 हजार कोटींची तरतूद.
शेततळ्यांच्या रकमेत 50% वाढ करून 75 हजार करण्यात येईल.
कृषी विभागासाठी 3025 कोटींचा निधी प्रस्थावित आहे.
15212 कोटी सहकार पणन वस्त्रोद्योग विभागाला प्रस्तावित आहेत.
2022-23 सिंचनाची 22 प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस आहे.
3533 कोटी रूपये मृद व जलसंधारण विभागाला प्रस्तावित.
1 लाख हेक्टर क्षेत्रावर फळबागांचे उद्दीष्ट आहे, फळबागांसाठी 540 कोटी प्रस्तावित आहे.
पशुसंवर्धन दुग्धविकास विभागास 406 कोटी प्रस्तावित.
आरोग्य
11 हजार कोटींचा निधी आरोग्य सेवांवर खर्च करण्याचे नियोजन आहे.
ग्रामीण भागासाठी
महाराष्ट्रात मिशन महाग्राम राबवले जाणार. त्यासाठी 500 कोटी दिले जाईल.
घरकुलांसाठी 6 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित.
दळवळण
2022-23 मध्ये रस्ते विकासासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला 15 हजार कोटी प्रस्तावित आहे.
समृद्धी महामार्गाचा विस्तार केला जाणार आहे.
जालना ते नांदेड मार्गाच्या भूसंपादनासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
नाबार्डने मंजूर केलेल्या रस्त्यांची कामं पूर्ण करण्यात येईल.
दरम्यान, गुरुवारी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात महाराष्ट्राचा 2021-22 सालचा आर्थिक पाहणी मांडण्यात आला.
2020-21 च्या आर्थिक पाहणी अहवालात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच क्षेत्रात मोठी घट झाली होती. फक्त कृषी क्षेत्रात 11.7 % वाढ झाली होती. पण आता अर्थव्यवस्था रूळावर येत असल्याचं 2021 च्या आर्थिक पाहणी अहवालात दिसून येत आहे.