महाराष्ट्रात 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीत सर्वच राजकीय पक्ष व्यस्त आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाडी लवकरच आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर करणार आहेत. मात्र, निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे आपण भाजप सोडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती निलेश राणे यांनी मंगळवारी दिली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कुडाळमधून निवडणूक लढवणार असल्याचं निलेश यांनी सांगितलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीतील जागावाटपानुसार कुडाळची जागा शिवसेनेच्या खात्यात जाणार आहे. यामुळेच नीलेश भाजपमधून शिवसेनेत जाणार आहेत.