महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत आज संध्याकाळी राज्यातील भाजपच्या सर्व बड्या नेत्यांची फडणवीसांच्या घरी बैठक

शुक्रवार, 21 जून 2024 (17:47 IST)
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप युतीने महाराष्ट्रात 48 पैकी 17 जागा जिंकल्या होत्या. भाजपने 9, शिवसेनेने 7 आणि राष्ट्रवादीने एक जागा जिंकली. विरोधी महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस, उद्धव ठाकरे गटाची शिवसेना, शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेसने चमकदार कामगिरी केली. 
 
या वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. राज्यातही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत विरोधकांची ताकद लक्षात घेता सत्ताधारी पक्ष भाजपला कोणताही धोका पत्करायचा नाही. एकनाथ शिंदे गटातील शिवसेना आणि भाजपने आतापासूनच निवडणुकीची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. 
 
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तयारी भाजपने तीव्र केली असून आज मुंबईत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक रात्री 8 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय आवासावर  होणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार हे उपस्थित राहणार आहे.  
 
या पूर्वी कोअर कमिटीने अमितशहा यांची भेट घेतली आणि सध्याच्या समस्येवर चर्चा केली. या भेटीला फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याशिवाय मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते.
 
Edited by - Priya Dixit 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती