Lok Sabha Election 2024: राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात दुपारी 1 वाजे पर्यंत 27.78 टक्के मतदान

सोमवार, 20 मे 2024 (17:59 IST)
सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचव्या टप्प्यासाठी आज 20 मे रोजी मतदान होत असून देशातील एकूण 6 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशात 49 जागांसाठी सकाळी 7 वाजे पासून मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यात दुपारी 1 वाजे पर्यंत 27.78 टक्के मतदान झाले आहे. 
महाराष्ट्रात  मुंबईतील सर्व सहा मतदारसंघासाठी मतदान होत आहे. त्यात ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी, नाशिक, दिंडोरी, आणि धुळे अशा 13 जागांसाठी मतदान झाले आहे. 

राज्यात आज दुपारी 1 वाजेपर्यंत 27.78% टक्के मतदान झाले
नाशिक- 28.51% ,धुळे-28.73% , दिंडोरी- 33.25% , उत्तर मुंबई- 26.78%
दक्षिण मुंबई- 24.46% ,उत्तर पश्चिम मुंबई- 28.41% ,उत्तर पूर्व मुंबई- 28.82% , उत्तर मध्य मुंबई- 28.05% , दक्षिण मध्य मुंबई-27.21% , पालघर- 31.06% , भिवंडी- 27.34% ,कल्याण- 22.52% , ठाणे- 26.05% 
 
Edited by - Priya Dixit  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती