राहुल, येच्युरी संघाच्या कार्यक्रमात सहभागी होणार का ?

सोमवार, 27 ऑगस्ट 2018 (15:45 IST)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून (आरएसएस) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सीपीएमचे सरचिटणीस सीताराम येच्युरी यांना दिल्लीत होणाऱ्या विशेष कार्यक्रमासाठी निमंत्रित करणार आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष म्हणून राहुल गांधी, सीताराम येच्युरी हे आमंत्रण स्वीकारणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. ‘भविष्य भारत का’ या विषयावर राजधानी दिल्ली येथे आरएसएसने सप्टेंबर १७ ते सप्टेंबर १९ कालावधित कार्यक्रम आयोजित केलाय. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात येणार असून, सोबतच विविध पक्षाच्या नेत्यांना देखील कार्यक्रमासाठी बोलवले जाणर आहे. याबाबत माहिती आरएसएसचे प्रवक्ते अरुण कुमार यांनी दिली आहे. राहुल गांधी यांनी आरएसएस वर जोरदार टीका आजपर्यंत केली आहे. नुकतेच राहुल यांनी लंडन विद्यार्थ्यांसमोर बोलताना असे म्हटले की ‘आमची लढाई ही संघासोबत आहे, जे देशाला वेगळं वळण देण्याच्या प्रयत्नात आहेत. संघ देशाच्या संस्थांवर आपली पकड मजबूत व्हावी म्हणून जोरदार प्रयत्न करत आहे. असं राहुल गांधी म्हणाले होते. तसेच त्यांनी इसिससोबत संघाशी तुलना केली होती. त्यामुळे आता गांधी तेथे जातील का ? नेमका कोणता निर्णय घेतील येणारा वेळच ठरलेव.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती