Webdunia चे 21 वर्ष : ऑनलाईन पत्रकारितेत रचले नवीन कीर्तिमान

बुधवार, 23 सप्टेंबर 2020 (14:07 IST)
तसं तर वेबदुनियाला जगातील पहिला हिंदी पोर्टल होण्याचा गर्व आहे, पण याच्या जन्माची कथाही कमी रोमांचक नाही आहे. छोट्याशा एका खोलीपासून सुरू झालेले हे वेब पोर्टल आता वटवृक्षाचा रूप धारण करून चुकला आहे. ज्या वेळेस इंटरनेटच्या क्षेत्रात भाषिक पोर्टल्ससाठी शक्यता बिलकुल नसल्यासारखी होती, त्या वेळेस 23 सप्टेंबर 1999ला याची सुरुवात झाली. याला घेऊन सुरुवात तर 1998 पासून सुरू झाली होती. सर्वात आधी बहुभाषी इ-मेल सेवा इ-पत्रावर काम झाले होते.
 
भारतात इंटरनेटची सुरुवात 80च्या दशकापासून झाली, पण विधिवत रूपेण 15 ऑगस्ट 1995मध्ये भारत संचार निगम लिमिटेडने गेटवे सर्विस लाँच करून याची सुरुवात केली. तेव्हा फक्त इंग्रजी वेबसाइट्स होत्या आणि सर्व काम इंग्रजीत होत होत. भारतात इंटरनेटच्या सुरुवातीच्या फक्त 3 वर्षांनंतर हिंदी पहिला पोर्टल वेबदुनिया डॉट कॉम लाँच झाला. याला हिंदी भाषासाठी नवीन क्रांतीची सुरुवात मानण्यात आली.
 
वेबदुनियाची ज्या वेळेस सुरुवात झाली, त्याच्या संघर्षाची पटकथादेखील त्याचवेळेस तयार झाली होती, कारण ज्या देशात जास्तकरून भाषिक वृत्तपत्रांची स्थिती जास्त चांगली नसल्यामुळे आणि अशा परिस्थितीत वेब पोर्टलची सुरुवात निश्चितच एक साहसिक काम होते. दुसर्याह अर्थात म्हटले तर हा दुःसहास होता.
 
या प्रकारे झाली सुरुवात    
वेबदुनियाचे औपचारिक शुभारंभ 23 सप्टेंबर, 1999ला तत्कालीन पंतप्रधान इन्द्रकुमार गुजराल यांनी केले होते. पण यामागे वेबदुनिया टीमचा अथक परिश्रम होता. पोर्टलचे पहिले संपादक प्रकाश हिंदुस्तानी यांच्या नेतृत्वात सहकार्यां नी झोप आणि भुकेची काळजी न करता निरंतर काम करत राहिले. 23 सप्टेंबर 1999ला एका स्वप्नाने आभासी जगात डोळे उघडले होते आणि यथार्थामध्ये खेळत आहे. एक हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बर्यारच लोकांनी आपले समर्पण, निष्ठा, श्रम, घाम आणि कर्माची आहुती दिली आहे. आपल्या स्वप्नांना याच वेबदुनियाशी जोडले आहे. अडचणी आल्या, प्रत्येक वाढत्या पाउलांबरोबर मंजिल दूर सरकत गेली पण प्रवास सुरूच होता. या प्रवासात लोकांच्या भेटीगाठी झाल्या आणि त्यांच्यात दुरावाही निर्माण झाला. पण प्रवास सुरूच राहिला. वेळेसोबत वेबदुनियाच्या परिवारात तमिळ, तेलगू, कन्नड, मल्ल्यालम, मराठी आणि गुजरातीचे पोर्टल. आज वेबदुनिया परिवारात हिंदी समेत सात पोर्टल आहे.
 
तुमच्या भाषेत तुमचा पोस्टमन- इ-पत्र
ज्या वेळेस कोणीही कल्पना ही केली नव्हती की इंटरनेटवर हिंदी किंवा इतर भारतीय भाषांमध्ये इ-मेल पाठवू शकतो, तेव्हा वेबदुनियाने ई-पत्राच्या माध्यमाने 1998 मध्ये पहिले हिंदी नंतर 10 इतर भारतीय भाषांमध्ये इ-मेल सेवेची सुरुवात केली होती. इ-पत्र जगातील पहिला ट्रांसलिटरेट इंजन होता, ज्याच्या माध्यमाने व्यक्ती रोमनमध्ये टाइप करून आपल्या भाषेत आपले संदेश पाठवू शकत होता. इ-पत्र पॅडच्या माध्यमाने वेबदुनियाने ऑफलाईन देखील ही सुविधा उपलब्ध करवून दिली होती, ज्याने व्यक्ती ऑफलाईनपण आपल्या भाषेत टाइप करू शकत होता. काम्प्युटरच्या भाषेत म्हणायचे झाले तर हे कॉमन इंटरनेट ऑफलाईन युटिलिटी सुविधा होती.
 
या प्रकारे बनला जगातील पहिला हिंदी सर्च इंजन
इंटरनेटवर बातम्या, आलेख इत्यादी साहित्य हिंदीमध्ये शोधू शकतो, याच्या सुरुवातीचे श्रेय देखील वेबदुनियाच्या खात्यात प्रविष्ट आहे. पोर्टलच्या सुरुवातीचे मात्र दोन वर्षांमध्ये जगातील पहिला हिंदी सर्च इंजन वेबदुनियाने बनवले. साहित्यकार आणि कथाकार अशोक चतुर्वेदी यांच्या नेतृत्वात वेबदुनियाची सर्च टीमने याला फारच चांगल्या प्रकारे निभावले. आज जेव्हा आम्ही बातमी किंवा या आलेखासोबत गरजेचे की-वर्ड टाकतो, ही पद्धत फारच सोपी आहे. पण त्या वेळेस प्रत्येक बातमी आणि आलेखसाठी वेगळ्या इंटरफेसच्या माध्यमाने की-वर्ड टाकावे लागत होते. हे फारच परिश्रमाचे काम होते, पण या टीममुळे सुरू झाला जगातील पहिला हिंदी सर्च इंजन.
 
आपल्या या सत्रा वर्षाच्या यात्रेत वेबदुनियाने बरेच बदल केले आणि बघितले देखील. रंग-रूप आणि प्रस्तुतीच्या आधारावर केलेले बरेच बदल आम्हाला नवीन ऊर्जा देऊन आपल्या वाचकांना रोज नवीन सामग्री देण्यासाठी प्रेरित करत आहे. एकदा परत वेबदुनियाच्या सर्व सात भाषांचे पोर्टल आपल्या नवीन साज-सज्जेसोबत आपल्या समोर सज्ज आहे. आम्ही फक्त रचनेत बदल न करत आपल्याला रुचकर लागेल अशी सामग्रीदेखील एकत्र केली आहे. आणि आमचा हा प्रयत्न नेहमीच सुरू असेल. या नवीन प्रस्तुतीत आमचा असा प्रयत्न करण्यात आला आहे की मोबाइल आणि टॅबलेटच्या या युगानुसार कशाप्रकारे आम्ही अधिक चित्रांसोबत प्रत्येक प्रस्तुतीला अधिक आकर्षक बनवू शकतो.
 
फोनेटिक की-बोर्ड- वेबदुनियाची तकनीकी दक्षता
फोनेटिक की-बोर्ड वेबदुनियाची तकनीकी दक्षतेला दर्शवतो. जेव्हा एखाद्याने इंटरनेटवर इंग्रजीशिवाय इतर भाषांमध्ये टाइप करण्याबद्दल विचार ही केला नव्हता, तेव्हा वेबदुनियाने फोनेटिक की-बोर्डाच्या माध्यमाने हिंदी समेत इतर भारतीय भाषांमध्ये टाइप करण्याची सुविधा प्रदान केली.
 
या प्रकारे झाली चॅटिंगची सुरुवात ... ई-वार्ता
या वेळेस चॅटिंग करणे स्वर्गातील अप्सरांशी बोलण्यासारखे होते आणि यावर चर्चा करणे जगातील सर्वात रोचक चर्चादेखील मानली जात होती. याचे किस्से आणि कहाण्या फारच रोचक आणि रोमांचक होते. यामुळे इंटरनेटच्या जगात कार्यक्षमता वाढली आणि कार्य सोपे व्हायला लागले. एखाद्या फाइलचे रूप विचारण्यासाठी फोनची आवश्यकता नव्हती आणि कुठलीही बातमी पाठवण्यासाठी फॅक्सची गरज नव्हती. सर्व काही फार लवकर होत होतं. 

या काळात वेबदुनियाने बर्याच प्रयोगांमध्ये एक नवीन प्रयोग केला आणि तो असा की चॅटच्या माध्यमाने संपूर्ण देशातील पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल आणि जनता दल (यू) नेता आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवानशी भारताच्या लोकांशी सरळ बोलणी करवून दिली पाहिजे.या विचाराला वेबदुनियाने 29 सप्टेंबर 2000 ला चँटचे आयोजन करून मूर्तरूप दिला. देशभरातील हजारो लोकांनी दोघांशी सरळ प्रश्न विचारले. हे फारच रोमांचक होते. आधी फक्त पत्रकारच प्रश्न विचारत होते, पण हा फारच कमालीचा अनुभव होता की देशाची आम जनता पण नेत्यांशी सरळ प्रश्न विचारू शकत होती. उमा भारती, मुरली मनोहर जोशींशी देखील चँटच्या माध्यमाने लोकांशी बोलणे झाले. आजकाल तर गूगल हँगआउटचा जमाना आहे.
 
हे म्हणण्यात काही ही अतिशयोक्ती नसेल की इंटरनेटवर भाषायी क्रांतीसाठी नवीन रस्ते शोधण्याचा श्रेय वेबदुनियाला जातो, ज्यावर आज देश आणि जगातील मोठमोठ्या कंपन्या चालत आहे.
 
वेबदुनियाच्या यात्रेत 'मैलाचा दगड'
तसं तर वेबदुनिया परिवारात वेळेवर बरेच साथी जुळले, बरेच नवीन मंजीलच्या शोधात पुढे ही वाढले. त्यातून काही आज देखील या यात्रेत आमच्या सोबत आहे. वरिष्ठ पत्रकार प्रकाश हिंदुस्तानी यांना वेबदुनियाचा पहिला संपादक होण्याचा गौरव प्राप्त आहे. त्यानंतर वेबदुनिया टीमचा नेतृत्व रवींद्र शाह (दिवंगत) यांनी सांभाळला. त्या काळातच किशोर भुराड़िया यांनी मुख्य परिचालन अधिकारी (सीओओ)ची भूमिका निभावली. शाह नंतर मनीष शर्मा संपादकीय प्रभारी बनले. त्यानंतर ही जबाबदारी जयदीप कर्णिक यांनी सांभाळली. वर्तमानात ही जबाबदारी संदीप सिसोदिया सांभाळत आहे. पंकज जैन यांनी बर्यांच वर्षांपर्यंत वेबदुनियाचे प्रेसिडेंट तथा सीओओचा भार सांभाळला आहे. उपर्युक्त सर्व दिग्गजांच्या कुशल नेतृत्वाचेच परिणाम आहे की आज वेबदुनिया या स्थानावर आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती