उद्धव ठाकरे आणि छगन भुजबळ यांची भेट

बुधवार, 29 ऑगस्ट 2018 (09:05 IST)
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि छगन भुजबळ यांची भेट नुकतीच झाली. या भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोच आहे. या दोघांची भेट आणि त्यांच्यात रंगलेल्या गप्पा हा राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे.
 
पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त पद्मनाथन यांच्या मुलाचे लग्न मुंबईत पार पडले. या लग्नात या दोन्ही नेत्यांसह सगळ्याच दिग्गज नेत्यांची हजेरी होती. मात्र चर्चा रंगली ती उद्धव ठाकरे आणि छगन भुजबळ यांच्या भेटीचीच. उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना खासदार संजय राऊतही होते. या दोघांनी कोणत्या विषयावर गप्पा मारल्या हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र त्यांच्या या भेटीमुळे आणि दिलखुलास गप्पांमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती