फेब्रुवारीनंतर केव्हाही निवडणूक, तयारीला लागा : शरद पवार

मंगळवार, 28 ऑगस्ट 2018 (15:29 IST)
मार्च अखेरीस लोकसभेबरोबरच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक घेण्याबाबत दिल्लीत खलबतं सुरू आहेत. फेब्रुवारीनंतर केव्हाही निवडणूक येऊ शकते. त्यामुळे तयारीला लागा, असे निर्देश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या राज्यातील प्रमुख नेत्यांच्या बैठकीत दिले. भाजपविरुद्ध विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू असून भाजपसोबत नाहीत अशा सर्वांना बरोबर घेण्याचा आपला प्रयत्न असणार असल्याची माहिती पवार यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
 
लोकसभेबरोबर महाराष्ट्र विधानसभेचीही मुदतपूर्व निवडणूक घेण्याचा भाजपा नेतृत्वाचा विचार आहे. दिल्लीत त्यादृष्टीने चाचपणी सुरू झाली आहे. फेब्रुवारीनंतर केव्हाही निवडणूक होऊ शकते. त्यामुळे आत्तापासूनच तयारी सुरू करण्याच्या सूचना पवार यांनी बैठकीत दिल्याचे समजते. आघाडीबाबत काँग्रेस सकारात्मक आहे. अन्य पक्षांनाही बरोबर घ्यावे लागणार आहे. आघाडीबाबत दिल्लीत प्राथमिक चर्चा झाली असल्याची माहिती पवार यांनी बैठकीत दिली. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती