इजिप्तमधील भूमध्य सुद्राजवळील एक शहरही असेच पाण्यात बुडाले. तिथे अनेक भव्य पुतळे होते. फ्रेंच संशोधक आणि अंडरवॉटर आर्कियोलॉजिस्ट फ्रँक गॉडिओ यांनी या शहराचा शोध लावला. इजिप्ताजवळील या समुद्रात त्यांना अनेक पुतळे व वस्तू आढळल्या. हजारो वर्षांपूर्वीच्या एका संपन्न शहराचे ते अवशेष होते. एका नैसर्गिक आपत्तीमुळे हे शहर समुद्रात गडप झाले होते.
इसवी सनापूर्वीच्या आठव्या शतकातील हेराक्लियन या शहराचे हे अवशेष आहेत. तेथील अनेक पुतळे बाहेर काढण्यात आले आहेत. अनेक पुतळे तब्बल शंभर फुटांपेक्षाही अधिक उंचीचे असून, त्यांची निर्मिती कशी केली गेली असावी, याबाबत संशोधकांना आश्चर्य वाटत आहे.