शांतीचा दूत म्हणून पाकिस्तानात : सिद्धू

शनिवार, 18 ऑगस्ट 2018 (11:23 IST)
भारत आणि पाकिस्तानमधील प्रेम आणि शांतीचा सद्‌भावना दूत म्हणून मी पाकिस्तानला जात असून यामुळे दोन्ही देशांतील संबंधात सुधारणा होईल, असा आशावाद भारताचे माजी क्रिकेटपटू आणि पंजाबचे कॅबिनेटमंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी व्यक्त केला.
 
माजी क्रिकेटपटू इम्रान खान हे आज निवारी पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी सिद्धू हे अटारी-वाघा बॉर्डरवर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 
 
इम्रान यांच्याकडून सिद्धूंसह भारताच्या माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर आणि कपिलदेव यांनाही शपथविधीस उपस्थित राहण्याचे औपचारिक निमंत्रण मिळाले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती