मुंबईकर जगभरात सर्वाधिक तास काम करतात. ते सर्वात जास्त राबतात असे एका सर्वेक्षणातून उघड झाले आहे. जगभरातल्या ७७ मोठय़ा शहरांचे स्वीस बँक यूबीएसच्या वतीने सर्वेक्षण केल्यानंतर ही गोष्ट स्पष्ट झाली आहे. जिनेव्हा, ज्युरीख आणि लग्जमबर्ग ही शहरे तासाच्या हिशेबाने काम करण्यात अग्रस्थानी आहेत तर मुंबई सर्वात खाली ७६व्या क्रमांकावर आहे. मुंबईनंतर काहीरा या शहराचा नंबर लागतो. या सर्वेक्षणामध्ये यूबीएसने १५ नोकऱ्या आणि व्यवसायांचा आढावा घेतला. त्यानुसार ज्युरीख सर्वाधिक महागडे शहर ठरले.