Refresh

This website p-marathi.webdunia.com/article/national-marathi-news/no-homework-for-students-of-classes-1-2-madras-high-court-118060100005_1.html is currently offline. Cloudflare's Always Online™ shows a snapshot of this web page from the Internet Archive's Wayback Machine. To check for the live version, click Refresh.

दुसरीपर्यंत मुलांना होमवर्क नको: हायकोर्ट

चेन्नई- मुलांना बालपणाचा आनंद पूर्णपणे लुटू द्या. तो त्यांचा अधिकारच आहे. त्यांना कोणाताही ताण देऊ नका. इयत्ता दुसरीपर्यंत मुलांना होमवर्क देऊ नका, असे आदेश मद्रास उच्च न्यायलयाने केंद्राला दिले.
 
सीबीएसई शाळांमध्ये एनसीईआरटी अभ्याक्रम सुरु करण्याचे आदेशही न्यायलयाने दिले. मुले वेट लिफ्टर नाहीत. मुलांवर शिक्षणाचे ओझे लादू नका, असे न्यायलयाने एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान म्हटले.
 
उच्च न्यायलयाचे न्या. एन. किरुबाकरन यांच्या खंडपीठाने सांगितले की मुलांना पुरेपूर झोप घेण्याचा अधिकार आहे. घटनेच्या 21 व्या कलमात हा अधिकार त्यांना देण्यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती