मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे हे मंत्री झाल्यानंतर अभिनेत्री दिशा पटानीने पहिली प्रतिक्रिया एका वृत्त वाहिनीशी बोलताना दिली आहे. यात आदित्य ठाकरे आता मंत्रिपदी आहेत, त्यांच्या कामावर तुझा किती विश्वास आहे, नेमक्या काय अपेक्षा तुझ्या आदित्य ठाकरे यांच्याकडून आहेत, असा प्रश्न दिशा पटानीला एका मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना दिशा पटानी म्हणाली, 'खरंतर आदित्य माझा चांगला मित्र आहे, अर्थातच त्याच्या कामावर मला विश्वास आहे. आपल्या देशालाही चांगल्या नेतृत्वाची गरज आहे. एवढा तरुण नेता महाराष्ट्राला मिळाला ही खूप चांगली बाब आहे.'
दिशा पटानी आदित्य ठाकरे यांची स्तृती करताना दिसली, ती पुढे असं देखील म्हणाली, 'आदित्य पर्यावरण संवर्धनासाठी काम करत आहेत, जंगल वाचवण्यावर त्यांचा भर दिसून येत आहे, यामुळे म्हणता येईल महाराष्ट्र सुरक्षित हातात आहे, मुंबईच्या नाइट लाईफसाठी त्यांनी पुढाकार घेतला, यामुळेच आपण रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरु शकतो, सिनेमा पाहू शकता. नाइट लार्फच्या संकल्पनेवर त्यांनी बरीच मेहनत घेतली आहे.'