bridal_lehenga_designn नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.या व्हीडिओला अनेकांनी पाहिलंय. लाईक केलंय. “याला म्हारी छोरी छोरो से कम है के…”, असं कॅप्शन देण्यात आलं आहे. तसेच यात वधू आपल्या वराला पुशअप्स करताना कडवी टक्कर देत असल्याचे दिसत आहे. यावर अनेकांनी हसण्याचे इमोजी शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर काहींनी मात्र या व्हीडिओची खिल्ली उडवली आहे. हेच बघायचं राहिलं होतं!, अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे.