करोना विषाणूपासून बचावासाठी दारू पिणे फायदेशीर नाही तर धोकादायक

मंगळवार, 31 मार्च 2020 (10:35 IST)
अल्कोहलच्या सेवनामुळे करोनाचा धोका टळतो, अशा आशयाच्या अनेक पोस्ट आपण सोशल मीडियावर बघितल्या असतील परंतू प्रत्यक्षात अल्कोहोलच्या सेवनामुळे करोनाचा धोका वाढत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.
 
डब्ल्यूएचओप्रमाणे सातत्याने किंवा अधिक प्रमाणात अल्कोहलचे सेवन केल्याने करोनासह इतर आजरांचाही धोका वाढतो. WHO ने करोनाला प्रतिबंध करण्यासंबंधीच्या उपायांबाबत ट्विटरद्वारे सूचना जारी केल्या. त्यात अल्कोहोलच्या सेवनामुळे करोनाचा धोका वाढतो, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
 
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर वापरलं जात असल्यामुळे दारुचा यांचा संबंध जोडला जात आहे. सॅनिटायझरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण सुमारे 40 ते 50 टक्के असते तसेच दारूमध्येही अल्कोहोलचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे दारु देखील करोनाला दूर ठेवण्यास मदत करेल अशी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहेत. परंतू आता डब्ल्यूएचओच्या स्पष्टीकरणानंतर अल्कोहोल आणि करोनाविषयीचा हा संभ्रम दूर होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती