लॉक डाउन: लॉक डाउन नंतर वाढत असलेली गुन्हेगारी, या 10 प्रकाराच्या खबरदारी घ्या..
बुधवार, 15 जुलै 2020 (19:48 IST)
लॉक डाउनच्या दरम्यान, बऱ्याच अडचणींना सामोरी जावं लागत आहे. असे बरेच लोकं आहे जे काहीही कमावत नाही आणि आपल्या नोकऱ्यादेखील गमावून बसलेले आहेत. त्यांचा व्यवसायांवर देखील परिणाम दिसून येत आहे ज्यामुळे असामाजिक घटनांमध्ये एकाएकी वाढ होण्याचे दिसत आहे आणि अश्या परिस्थितीमध्ये आपल्याला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे आणि आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेकडे लक्ष देण्याची गरज आहे. अशा वेळी स्वतःसावध राहा आणि आपल्या कुटुंबाची देखील पूर्णपणे काळजी घ्या.
स्पष्टच आहे की लॉकडाउन नंतर, प्रत्येक जण आपापली घरे सोडत आहे, पण ज्या वेळी ते बाहेर पडतात, त्यांना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्या जेणे करून आपण स्वतःला तसेच आपल्या प्रियजनांना देखील सुरक्षित ठेवू शकाल.
या वेळी सावधगिरी बाळगणे फार महत्त्वाचे आहे, म्हणून काही गोष्टी लक्षात ठेवाव्या.
* या वेळी महागड्या घड्याळी, साखळी, कानातले, घालण्यापासून वाचा, आणि सावध राहा.
* सार्वजनिक जागी जाताना फोनचा वापर जास्त करू नका. सार्वजनिकरीत्या मोबाइलचा वापर शक्यतो कमीत कमी करावा.
* गरजेपेक्षा जास्त पैसे जवळ ठेवू नये.
* एखादी अनोळखी माणूस आपल्या कडून लिफ्ट मागत असल्यास सावधगिरी बाळगा. आपली सुरक्षा आपल्याच हाती आहे, त्याला लिफ्ट देऊ नये.
* आपल्या क्रेडिट आणि डेबिट कार्डाला सुरक्षित ठेवा.
* वेळोवेळी घरी बोलत राहा आणि आपल्या कुटुंबीयांच्या तब्येतीची विचारपूस करा.
* मुलांना वेळेवर घरी येण्याची सूचना द्या. तसेच त्यांना समजवावे की अनोळखी माणसांशी जास्त बोलू नये.
* घरातील वरिष्ठांना सूचना देऊन ठेवा की दाराची बेल वाजवून मुख्य दारापासून सुरक्षित अंतर राखा. शक्य असल्यास पार्सल किंवा पत्र मिळविण्यासाठी ग्रिलगेटला ग्रिलच्या जवळ जाऊ देऊ नये. दार खोलण्याआधी, खिडकी मधून बघा की दारावर कोण आहे. अचानकपणे दार उघडू नये.
* घरापर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्याही निर्जन किंवा शॉर्टकट मार्गांची निवड करू नका. अधिकाधिक मुख्य मार्गाचाच वापर करण्याचा प्रयत्न करा.
* मॉर्निंगवॉक करण्यासाठी साधारणपणे सकाळी 6 वाजेच्या सुमारास उजेडात जा, संध्याकाळी जास्तीत जास्त 8 वाजेपर्यंत मुख्य रस्त्यांचा वापर करा, रिकाम्या रस्त्यांचा वापर करू नये.
* व्यापारी वर्गाने रात्रीच्या वेळी रोख रक्कम घेऊन जाणे टाळावे. संध्याकाळी 7 वाजेच्या नंतर दर एका तासात घरच्यांना सूचना देत राहा. आपल्या बरोबर एक आय कार्ड/ घराच्या एखाद्या व्यक्तीचा मोबाइल नंबर ठेवा.
* जे लोकं कॅब सेवांचा वापर करतात, कृपा करून आपल्या आई- वडिलांना, भाऊ -बहिणीला, नातलगांना, मित्रांना आपल्या प्रवासाची माहिती देत राहा.