[$--lok#2019#state#maharashtra--$]
मुख्य लढत : सुनील मेंढे (भाजप) विरुद्ध नाना पंचबुद्धे (राष्ट्रवादी)
सुनील मेंढे हे प्रथमच लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. तर तर नाना पंचबुद्धे हे माजी राज्यमंत्री आहेत. पांरपरिक काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून या मतदार संघावर सातत्याने काँग्रेस व राष्टष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. या मतदार संघात भाजपाने चार वेळा काँग्रेसला दणका दिला आहे. यात १९८९,१९९९,२००४ आणि २०१४ मध्ये हा मतदार संघ भाजपाने आपल्याकडे खेचून घेतला.
[$--lok#2019#constituency#maharashtra--$]
लोकसभा निवडणुकीत यावेळी लोकसभेच्या 543 जागांमधून महाराष्ट्रात 48 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान ११ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिललला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २३ एप्रिलला आणि चौथ्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला संपन्न झाले होते. चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत सरासरी 60.68 टक्के मतदान झाले. 2014 साली देशात 9 तर महाराष्ट्रात 3 टप्प्यांत मतदान झालं होतं. निवडुणकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे.