भारतीय जनता पार्टीने लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या नावासोबत नितीन गडकरी, राजनाथ सिंह, स्मृती इराणी अशा दिग्गज भाजपा नेत्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
या यादीमध्ये बहुतांश विद्यमान खासदारांना पुन्हा संधी दिल्याचं पाहायला मिळालं, नागपूरमधून नितीन गडकरी, रावेरमधून एकनाथ खडसेंच्या सुनबाई रक्षा खडसे, जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, धुळे लोकसभा मतदारसंघातून डॉ. सुभाष भामरे, चंद्रपूर येथून हंसराज अहिर, नंदुरबारमधून डॉ. हिना गावित, अकोला लोकसभा मतदारसंघातून संजय धोत्रे, भिवंडीतून कपिल पाटील, उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी, बीडमधून प्रीतम मुंडे, मुंबई पश्चिम मध्य मुंबईतून पूनम महाजन, वर्धा येथून रामदास तडस, चिमूरमधून अशोक नेते, सांगली येथून संजयकाका पाटील या विद्यमान खासदारांना भाजपाने पुन्हा संधी दिली आहे.