‘गुगल मॅप्स' मध्ये आले ‘स्पीडोमीटर’ चे फीचर

गुगलने ‘गुगल मॅप्स’च्या अँड्रॉइड व्हर्जनसाठी एक नवं फीचर आणलं आहे. या ‘स्पीडोमीटर’ फीचरच्या मदतीनेकिती वेगाने गाडी चालवत आहात याबाबत कळणार आहे. हे फीचर ‘गुगल मॅप्स’ या अॅपच्या ‘सेटिंग्स’ मेन्यूमध्ये उपलब्ध आहे. तेथून हे फीचर सुरू करता येईल. या नव्या फीचरआधीच ‘गुगल मॅप्स’ने सर्व युजर्ससाठी ‘स्पीड लिमिट’ हे फीचर रोलआउट केलं आहे. गुगलने ‘स्पीड लिमिट’ आणि ‘स्पीड कॅमेरा रिपोर्टिंग’ या फीचर्सची दोन वर्षांपर्यंत चाचणी घेतली, त्यानंतर भारतासह 40 देशांमध्ये कंपनीने हे फीचर सर्व युजर्ससाठी उपलब्ध करुन दिलं आहे.
 
भारतातील अनेक शहरांमध्ये स्पीड कॅमेरे लागले आहेत, त्यामुळे ‘गुगल मॅप्स’चं हे फीचर ट्रॅफिक पोलीस आणि दंड भरण्यापासून वाचवेल. नव्या स्पीड लिमिट फीचरमुळे युजर्सना एखाद्या रस्त्यावरील ठरलेली वेगमर्यादा कळेल आणि याच आधारे जर ड्रायव्हरने कमाल वेगापेक्षा अधिक वेगाने गाडी नेण्याचा प्रयत्न केला तर ‘स्पीडोमीटर’ फीचरद्वारे अलर्ट मिळेल. ‘स्पीडोमीटर’ फीचर सुरू झाल्यानंतर गुगल मॅप्सच्या स्क्रीनवर खालच्या बाजूला ड्रायव्हिंग स्पीड दिसेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती