लॅपटॉपचा कीबोर्ड स्वच्छ करण्याची सोपी पद्धत जाणून घ्या

बुधवार, 3 मार्च 2021 (19:37 IST)
लॅपटॉप कीबोर्ड स्वच्छ करण्याचे टिप्स जाणून घ्या. लॅपटॉपचा सतत वापर केल्याने कीबोर्डवर घाण साचते धुळीचे कण अडकून बसतात. या मुळे लॅपटॉप हळू काम करतो. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लोक बाहेर दुकानावर जाऊन लॅपटॉपची स्वच्छता करण्याचा धाडस करत नाही. आपण घरातच लॅपटॉप या पद्धतीने स्वच्छ करू शकता. चला तर मग जाणून घेऊ या काय आहेत टिप्स.
 
1 लॅपटॉप चार्जींग वरून काढून घ्या-
लॅपटॉप स्वच्छ करण्यासाठी सर्वप्रथम ते चार्जिंग वरून काढून घ्या.   नंतरच कीबोर्ड स्वच्छ करा.
 
2 लॅपटॉप पालटवून हालवून घ्या-
लॅपटॉपचा कीबोर्ड बंद करून पालटून घ्या आणि हळुवार हाताने हलवा, असं केल्याने कीबोर्डच्या आत साचलेली घाण बाहेर निघून जाते आणि लॅपटॉप वेगाने काम करू लागतो. घाण देखील स्वच्छ होते.
 
3 की बोर्ड स्वच्छ करण्यासाठी मऊ ब्रश वापरा. ऑल इन वन ब्रश किंवा मऊ कपड्याने पुसून स्वच्छ करा.
 
4 मायक्रोफायबर कपड्याचा वापर करा- 
एक लिंट फ्री कापड्याचा कोपरा ओला करून कीबोर्डच्या की  मायक्रोफायबर कापड्याने पुसून घ्या लॅपटॉप स्वच्छ होईल.
 
5 आयसोप्रोपिल अल्कोहोलमध्ये कापड बुडवून पुसून घ्या-
साठलेली घाण स्वच्छ करण्यासाठी अल्कोहोल चा वापर करा हे पाण्यापेक्षा लवकर कोरडे होते. अल्कोहोलचा वापर केल्याने लॅपटॉपवर साचलेली घाण सहजपणे बाहेर निघते ओलसरपणा देखील राहणार नाही. हे वापरल्यावर लॅपटॉपच्या कीबोर्डाला कोरड्या कापड्याने पुसून घ्या. दररोज लॅपटॉपचा वापर करण्यापूर्वी स्वच्छ कोरड्या कापड्याने लॅपटॉप पुसून घ्या त्यावर घाण साचते. जी स्वच्छ करणे आवश्यक आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती