YouTube चं नवीन फीचर, मुलं काय बघतात यावर लक्ष ठेवता येईल

शनिवार, 27 फेब्रुवारी 2021 (15:04 IST)
व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूबने एका खास फीचरची घोषणा केली आहे. ज्याने पालक आता या मुलांवर लक्ष ठेवू शकणार आहे. या प्लॅटफॉर्मवर मुलांसाठी प्रतिबंध लावणे शक्य होणार आहे.
 
कंपनीने आपल्या एका ब्लॉगमध्ये म्हटले की सुरुवातीला हे फीचर बीटा टेस्टरसाठी जारी केलं जाईल. या फीचरमध्ये पॅरेंट्ससाठी एका सूपर्वाईज्ड गुगल अकाउंटच्या माध्यमातून पालकांना आपल्या मुलांच्या यूट्यूब अकाउंटची अॅक्सेस असेल. अशात मुलं काय बघतात यावर पालक लक्ष ठेवून त्यावर प्रतिबंध लावू शकतील.
 
नव्या फीचरसाठी कंपनी तीन वेगवेगळ्या सेटिंग्स असतील. जाणून घ्या सेटिंग्जबद्दल-
1. एक्सप्लोर सेटिंग 9 वर्षाहून अधिक वयाच्या मुलांसाठी असेल. या सेटिंगच्या व्हिडीओमध्ये व्लॉग्स, ट्यूटोरियल, गेमिंग, व्हिडीओज, म्यूजिक क्लिप, न्यूजचा समावेश असेल.
2. एक्सप्लोर मोर या सेटिंगमध्ये 13 वर्षाहून अधिक वयाच्या मुलांवर लक्ष ठेवता येईल. यात सेटिंग इनेबल केल्यावर व्ह्यूवर्सकडे व्हिडीओ पाहण्यासाठी अधिक पर्याय मिळतील. या कॅटेगरीमध्ये लाईव्ह स्ट्रीमही अ‍ॅक्सेस करता येईल.
3. मोस्ट ऑफ यूट्यूब - या सेटिंगमध्ये मुलं यूट्यूबवरील सर्वच व्हिडीओ पाहू शकतील. यात मुलं केवळ वय निर्बंध असलेले संवेदनशील व्हिडीओ पाहू शकणार नाहीत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती