फेसबुकने सादर केले क्रिप्टोकरेंसी प्लान, म्हटले यामुळे लोकांच्या आर्थिक गरजा होतील पूर्ण

बुधवार, 19 जून 2019 (11:44 IST)
फेसबुकने मंगळवारी आपल्या क्रिप्टोकरेंसी प्लॅनला ग्लोबली सादर केले आहे. कंपनीनुसार नवीन डिजीटल करेंसीला तयार करण्यात येणार आहे ज्याचे बिटकॉइनसारखे ग्लोबली वापर केला जाईल. यामुळे ई-कॉमर्स सर्विसला प्रोत्साहन मिळेल तसेच जाहिरातींच्या माध्यमाने जास्त कमाईची संधी देखील मिळेल. फेसबुकने याची पेपाल, उबर, स्पॉटिफाई, विजा, मास्टरकार्ड समेत 28 कंपन्यांसोबत पार्टनरशिप केली आहे. कंपनीसोबतच फेसबुकचे डिजीटल वॉलेट कालिबराबद्दल देखील सांगितले आले आहे ज्याच्या माध्यमाने जगभरात पेमेंट करणे फोटो पाठवण्यासारखे सोपे होऊन जाईल.
 
सध्या फेसबुक याच्या प्राइवेसीबद्दल कायदेशीर प्रक्रियेतून जात आहे. डेटा प्रायवेसीच्या विवादांबद्दल आधीपासूनच फेसबुक चर्चेत असतो आणि आता करेंसी बनवत असल्यामुळे बँक, नॅशनल करेंसी आणि यूजर्सच्या प्रायवेसीला धोका होऊ शकतो. पण फेसबुकचे म्हणणे आहे की तो यूजर्सची बँक डिटेल आणि पेमेंट संबंधित सर्व माहिती सुरक्षित ठेवेल. 
 
कंपनीचे म्हणणे आहे की हे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी वर काम करेल ज्याच्या माध्यमाने लोक पैसांचा व्यवहार करू शकतील, ज्यात पैसे पाठवणे, पैसे रिसीव्ह करणे आणि त्याला सेव्ह करणे सामील आहे. कंपनीचे अधिकारी डेविड मार्केस यांचे म्हणणे आहे की कालिबराच्या माध्यमाने जगातील अरब लोकांपर्यंत ओपन फाइनेंशियल इकोसिस्टम पोहोचण्याची शक्यता आहे.
 
सामान्य यूजरला काय फायदा
कंपनीचे म्हणणे आहे की याला 2020 पर्यंत सामान्य लोकांसाठी जारी करण्यात येईल. याला फेसबुकच्या सर्व प्लेटफार्म जसे  मेसेंजर, वॉट्सऐप आणि इंस्टाग्रामहून वापर करण्यात येईल. कंपनीनुसार यात यूजरचा डाटा सुरक्षित राहील तसेच कंपनी डेटा सिक्योरिटीसाठी वेरिफिकेशन प्रोसेस आणि लाइव्ह सपोर्ट सिस्टमदेखील राहील.
 
फेसबुक मेसेंजरवर पैसे पाठवणे आणि रिसीव्ह करू शकता.
वॉट्सऐपच्या माध्यमाने देखील ट्रांजेक्शन करू शकता.
यासाठी एक खास डिजीटल वॉलेट एप बनवण्यात येईल, ज्यात ट्रांजेक्शन ट्रॅक करण्यात येईल.
याच्या माध्यमाने पैसे पाठवण्यासाठी कुठलेही एक्सट्रा चार्ज लागणार नाही.
ग्राहकांना लाइव्ह सपोर्टची सुविधा मिळेल.
काय आहे क्रिप्टोकरेंसी
क्रिप्टोकरेंसी एक डिजीटल मुद्रा आहे. याला डिजीटल वॉलेटमध्ये ठेवून देखील देवाण घेवाण करू शकता. ही पद्धत 2009 मध्ये सर्वात आधी जगासमोर आली होती. याच्या माध्यमाने बँकांना माध्यम न बनवता देवाण घेवाण करू शकता. सध्या भारतात या मुद्रेला ना तर आधिकारिक अनुमती आहे ना ही याला रेग्युलेट करण्याचे कुठलेही नियम आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती