एअरटेल प्रवक्त्याने म्हटले की आम्ही हैराण आहोत, कारण हे ट्रायच्या निर्देशांचे उल्लंघन आहे. हे तर तोच प्लान दुसर्या नावाने चालवण्याची बाब आहे. अर्थात नवीन बाटलीत जुनी दारू विकण्यासारखे आहे. अथॉरिटी त्याविरोधात पाऊल उचलले अशी उमेद जाहीर केली आहे.
उल्लेखनीय आहे की रिलायन्स जियोने ट्रायच्या निर्देशानंतर सरप्राइज ऑफर बंद केल्यानंतर आपला नवीन ऑफर काढली. धन धना धन नावाच्या या ऑफरमध्ये यूझर्सला दर रोज 1 जीबी ते 2 जीबी पर्यंत 4 जी डेटा मिळेल. या प्लानची किंमत 309 रुपये आकारण्यात आली आहे. यात प्राइम मेंबरर्सला 84 दिवसांपर्यंत दररोज 1 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. तसेच नॉन प्राइम मेंबरर्सला या ऑफरसाठी 349 रुपये भरावे लागतील. नवीन सिम घेणार्यांकडून या प्लानसाठी 408 रुपये आकारण्यात येतील.