AIRTEL या प्लान सोबत देत आहे 4 लाखाचा इंश्योरेंस कवर

मंगळवार, 24 सप्टेंबर 2019 (12:11 IST)
दूरसंचार सेवा प्रदाता कंपनी भारती एयरटेलने आपल्या ग्राहकांना प्रीपेड बंडल प्लानसोबत चार लाख रुपयांचा विमा कव्हर प्रदान करण्याच्या उद्देश्याने   भारती एक्सा लाईफ इंश्योरेंससोबत युती केली आहे. कंपनीने सोमवारी येथे एका बनायात सांगितले की 599 रुपयांच्या प्रीपेड बंडल प्लान सादर केला आहे ज्याच्यासोबत चार लाख रुपयांचे जीवन विमा कव्हर मिळेल.   
 
या प्लानमध्ये 2जीबी डेटा रोज, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल आणि 100 एसएमएस रोज मिळतील. याची वैधता 84 दिवसांची राहणार आहे आणि रिचार्जनंतर विमा कव्हर स्वत:च तीन महिन्यासाठी पुढे वाढेल. 
 
एयरटेल आणि भारती एक्सा लाईफ इंश्योरेंसने ग्रामीण क्षेत्रांमध्ये राहणारे असे करोडो लोकांना लक्षात ठेवून हा प्लान तयार केला आला आहे जो सध्या विमा कव्हरच्या क्षेत्रात नाही आहे. आता एयरटेल त्या लोकांना प्रत्येक वेळेस मोबाइल फोन रिचार्ज केल्यावर जीवन विमा कव्हरचा लाभ प्रदान करण्यास इच्छुक आहे.
 
एयरटेलने सर्व प्रक्रियेला काही मिनिटातच पूर्ण करण्यासाठी डिजीटल केले आहे. ग्राहकाला आधी रिचार्ज नंतर एसएमएस, एयरटेल थँक्स ऐप या एयरटेल रिटेलरच्या माध्यमाने विमासाठी नावनोंदणी करावे लागणार आहे. सुरुवातीत हा प्लान तामिळनाडू आणि पाँडेचरीच्या ग्राहकांसाठी उपलब्ध राहील आणि पुढील काही महिन्यात याची उपलब्धता संपूर्ण भारतात राहणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती