IPL 2024 मध्ये आज हैदराबाद आणि मुंबईत सामना खेळवला जाणार आहे. मुंबईचे 11 सामन्यांतील तीन विजयातून केवळ सहा गुण आहेत आणि संघ प्ले-ऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे.10 सामन्यांत सहा विजय आणि 4 पराभवांसह 12 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर असलेल्या सनरायझर्सला अष्टपैलू कामगिरी करण्यासाठी आणि विशेषत: आपल्या गोलंदाजी विभागामध्ये सुधारणा करण्यास उत्सुक आहे.
10 सामन्यांत सहा विजय आणि चार पराभवांसह 12 गुणांसह चौथ्या स्थानावर असलेल्या हैदराबादला अष्टपैलू कामगिरी करण्यासाठी आणि विशेषत: आपल्या गोलंदाजीत सुधारणा करावी लागेल.वानखेडेची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे. या खेळपट्टीवर मोठी धाव संख्या होऊ शकते. ट्रॅव्हिस हेड,अभिषेक शर्मा आणि हेनरिक क्लासेन सनरायझर्ससाठी सतत धावा करत आहेत, पण संघाला दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करामकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.टी नटराजनची अचूक गोलंदाजी सनरायझर्ससाठी महत्त्वाची ठरेल.
मुंबईचा संघ 11 सामन्यांत तीन विजय मिळवून केवळ सहा गुण आहेत आणि संघ प्ले-ऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. मुंबईचे प्रमुख भारतीय खेळाडू रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या आगामी टी20 विश्वचषकासाठी त्यांच्या वैयक्तिक फॉर्मवर लक्ष केंद्रित करतील.
दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग-11
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टीम डेव्हिड, नेहल वढेरा, रोमॅरियो शेफर्ड, जेराल्ड कोएत्झी , पियुष चावला, जसप्रीत बुमराह.
सनरायझर्स हैदराबादः ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, अनमोलप्रीत सिंग, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जेन्सन, पॅट कमिन्स (क), भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन.