व्यंकटेश अय्यरने या सामन्यात 28 चेंडूत 51 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने 182.14 च्या स्ट्राईक रेटने 5 चौकार आणि 4 षटकार मारले. वेंकटेश अय्यरचे आयपीएल प्लेऑफमधले हे तिसरे अर्धशतक आहे आणि तिन्ही अर्धशतके सलग तीन डावात आहेत. यानंतर व्यंकटेश अय्यर हा IPL प्लेऑफच्या सलग तीन डावात 50+ धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी त्याने 2021 च्या प्लेऑफमध्ये 2 अर्धशतके झळकावली होती आणि आता या मोसमात त्याचे तिसरे अर्धशतक झाले आहे.
दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना त्याने 19.3 षटकात 159 धावा केल्या आणि त्याचा संघ सर्वबाद झाला. यानंतर केकेआरच्या फलंदाजांनी अतिशय वेगवान सुरुवात करत अवघ्या 13.4 षटकात 2 गडी गमावून 164 धावा करत सामना जिंकला.