पंजाबपुढे आज ‘करो या मरो’ची स्थिती

WD
सोमवार 6 मे रोजी येथे यजमान किंग्ज इलेव्हन पंजाब आणि प्रबळ असा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघात सहाव्या आयपीएल स्पर्धेतील ट्वेंटी-20 साखळी क्रिकेट सामना खेळला जात आहे.

हा सामना म्हणजे पंजाबसाठी ‘करो या मरो’ अशा स्थितीचा राहील. पंजाबने 10 सामन्यात 4 विजांसह 8 गुण मिळविले आहेत व हा संघ आयपीएल साखळी गुणतक्त्यात सहाव्या स्थानी आहे. पहिल्या चार संघात म्हणजेच प्ले ऑफ फेरी गाठण्यासाठी पंजाबला सहापैकी चार सामने जिंकण्याची गरज आहे. या सामन्यात पराभव झाला तर मात्र पंजाब संघाची या स्पर्धेतील मोहीम संपुष्टात आल्यासारखे होईल.

बंगळुरू संघात ख्रिस गेल, कर्णधार विराट कोहली असे तडफदार फलंदाज आहेत. या दोघांशिवाय एबी डी’व्हिलिअर्स, सौरभ तिवारी यासारखे फलंदाज आहेत. पंजाबचा कर्णधार अँमम गिलख्रिस्ट याला वारंवार संघाबाहेर बसावे लागत आहे. बंगळुरू संघाने 11 पैकी 7 विजय मिळविले आहेत. त्यामुळे त्यांची स्थिती भक्कम अशी झालेली आहे. पुणे वॉरिअर्सविरुद्ध 23 एप्रिल रोजी बंगळुरू येथे रॉयल संघाने 263 धावा केल होत व ख्रिस गेलने 66 चेंडूंवर 175 धावा झोडपल्या होत्या. त्यामुळे गेलचेसुद्धा पंजाबपुढे आव्हान असणार आहे. पुण्याला पराभूत केल्यानंतर बंगळुरूने लागोपाठ दोन पराभव पत्करले होते. पंजाबनेसुद्धा चेन्नईकडून 15 धावांनी पराभव पत्करला होता. त्यामुळे या दोन संघात अटीतटीची व प्रेक्षणीय झुंज अपेक्षित आहे. पंजाबचा कर्णधार डेव्हिड हसी यानेही चेन्नई फलंदाजांचे कौतुक केले आहे.

वेबदुनिया वर वाचा