आयपीएलच्या यंदाच्या लिलावत केदार जाधव अनसोल्ड राहिला होता. त्याच्यावर कोणत्याही संघाने बोली लावली नव्हती. जिओ सिनेमासाठी केदार जाधव मराठीतून कॉमेंट्री करत होता. उर्वरित आयपीएल सामन्यासाठी केदार जाधवला बंगळुरूने आपल्या ताफ्यात घेतले आहे. दरम्यान, यंदाच्या हंगामात डेविड विली याने फक्त तीन सामने खेळले आहेत. या तीन सामन्यात त्याने चार विकेट घेतल्या आहेत.
केदार जाधव याने २०१० मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. आतापर्यंत त्याने ९३ आयपीएल सामन्यात ११९६ धावा केल्या आहेत. केदार जाधव याआधीही बंगळुरूचा संघाचा सदस्य होता. केदार जाधव याला आरसीबीने एक कोटी रुपयांना विकत घेतले होते. केदार जाधव याने बंगळुरूसाठी सतरा सामने खेळले आहे. बंगळुरूचा मध्यक्रम सध्या ढेपाळत आहे. त्यामुळे अनुभवी फलंदाजाला आरसीबीने आपल्या ताफ्यात घेतले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor