पराभव झाल्यास हैदराबादचे होईल स्वप्नभंग

मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020 (14:22 IST)
दिल्ली कॅपिटल्सला मागील दोन सामन्यांतील पराभव विसरून सनराझर्स हैदराबादविरुध्द आज (मंगळवारी) होणार्या- आयपीएलच्या महत्त्वपूर्ण सामन्यात विजय मिळवत प्ले ऑफमध्ये आपली जागा पक्की करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. कोलकाता व पंजाबविरुध्द पराभव झाल्यानंतर दिल्लीला आता आपल्या गुणांची संख्या 16 करण्यासाठी दोन गुणांची गरज आहे. 
 
यामुळे तो गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचेल. तर दुसरीकडे हैदराबादच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जर-तरच आहेत. हैदराबादचा पराभव झाल्यास त्यांचे स्वप्नभंग होऊ शकते. हैदराबादचे 11 सामन्यांतून 8 गुण असून त्यांचा संघ सातव्या स्थानावर आहे. प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना केवळ आपले सर्वच सामने जिंकून चालणार नाही तर अन्य सामन्यांचे निकालही त्यांच्यासाठी अनुकूल होण्याची अपेक्षा ठेवावी लागेल. दिल्लीकडे आक्रमक फलंदाज व मजबूत गोलंदाजी आहे. ते कोणा एका खेळाडूवर अवलंबून नाहीत.
 
दुसरीकडे हैदराबादचा संघ मागील सामन्यातील कामगिरी विसरून पुन्हा नव्या दमाने पुनरागमन करेल. त्यांच्याकडे बेअरस्टो,वॉर्नर, मनीष पांडे यासारखे फलंदाज आहेत. विजय  शंकरने राजस्थानविरूध्द चांगली कामगिरी केली होती. पंजाबविरुध्द मात्र तो अपयशी ठरला. जेसन होल्डरच्या समावेशामुळे त्यांची गोलंदाजी मजबूत झाली आहे. वॉर्नरला त्यांच्या गोलंदाजांकडून मागील सामन्यातील उत्तम कामगिरीची अपेक्षा असेल.
 
सामन्याची वेळ संध्याकाळी 7.30 वाजता

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती