रशियावरील हल्ल्याचा सराव करताना अमेरिकी वैमानिकानं अणूबाँब पाण्यात फेकला आणि..
शनिवार, 15 जुलै 2023 (23:04 IST)
अमेरिकेचे तीन अणुबाँब कित्येक वर्षांपूर्वी हरवले होते. हे विनाशकारी अणुबाँब अद्यापही गायब आहेत. ते मुळात हरवलेच कसे? कुठे असतील? सापडण्याची शक्यता किती?
शीतयुद्ध ऐन भरात होतं तेव्हाचा काळ. हिवाळ्यातली ती सकाळ त्या दिवशी थोडी कमी थंड होती.
17 जानेवारी 1966 चा दिवस, सकाळी साडेदहाची वेळ असावी. एका स्पॅनिश मच्छीमाराला भर समुद्रात कोलंबी पकडत असताना आकाशातून एक पांढरी वस्तू खाली येताना दिसली.
हळूहळू उडत ती अलबोरान समुद्राच्या दिशेने येताना त्याने पाहिली. उडणाऱ्या छत्रीखाली काहीतरी लटकतानाही त्याला दिसलं पण नेमकं काय होतं तेवढं काही दिसलं नाही. शेवटी ते समुद्रात पडलं आणि लाटांमध्ये हरवून गेलं.
जवळच्या पालोमेरेस नावाच्या मच्छीमारांच्या गावात नेमक्या त्याच वेळी स्थानिकांना आकाशात एक वेगळंच भयावह दृश्य दिसलं.
दोन मोठे अग्निगोल त्यांच्या दिशेने झेपावताना गावकऱ्यांनी पाहिले. अवघ्या काही सेंकंदात ते पेंगुळलेलं टुमदार गाव हादरलं, इमारती थरथरल्या जमिनीला गोळा लागला आणि सगळं उद्ध्वस्त झालं. मानवी शरीराचे तुकडे आसमंतातून उडून जमिनीवर विखुरले.
हे घडल्यानंतर काही आठवड्यांत फिलीप मेयर्स यांना टेलिप्रिंटरवर एक संदेश मिळाला. आजच्या ईमेलची जुनी आवृत्ती असणारे टेलिप्रिंटर त्या काळात लष्करी सेवा आणि संदेशवहनासाठी वापरण्यात येत.
हा संदेश मिळाला त्या वेळी मायर्स हे सिसिलीच्या पूर्वेच्या भागात सिगोनेला इथल्या नेव्हल एअर फॅसिलिटीमध्ये बाँब निकामी करणाऱ्या विभागात अधिकारी म्हणून कार्यरत होते.
स्पेनमध्ये एका अत्यंत गोपनीय कामासाठी तातडीने निघावं लागेल. पुढच्या काही दिवसांत त्यांना तिथे पोहोचायला सांगणारा आदेश आला होता.
पण लष्कराला अपेक्षित होतं तेवढं हे मिशन गोपनीय राहिलेलं नव्हतं.
"अचंबित करणारं त्यात काहीच नव्हतं", मेयर्स सांगतात.
नेमकं काय सुरू आहे ते सगळ्या जनतेलाही ठाऊक होतं.
मेयर्स यांनी संध्याकाळच्या पार्टीत जेव्हा आपल्या गोपनीय ट्रिपची वाच्यता केली आणि ती किती सिक्रेट आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, यासंदर्भातली गोपनीयता हाच मुळी त्या वेळी विनोदाचा विषय झाला होता.
"ते इतकं लाजिरवाणं होतं. म्हणजे माझे मित्रच मला माझ्या गोपनीय कामाबद्दल आणि मी तिथे का जाणार आहे ते सांगत होते", मेयर्स सांगतात.
पुढचे काही आठवडे जगभरातल्या वर्तमानपत्रांमधून या भयंकर घटनेबद्दल उलट-सुलट छापून येत होतं.
दोन अमेरिकी लष्करी विमानं आकाशात एकमेकांना धडकली. त्यातून चार B28 थर्मोन्यूक्लिअर बाँब पालोमेरेस गावात कोसळले.
त्यामधले तीन बाँब लगेचच जमिनीवर पडलेले सापडले. पण एक बाँब मात्र गायब झाला.
गावाच्या आग्नेयेला असणाऱ्या भूमध्य समुद्रातल्या निळाईत तो हरवला.
एव्हाना तो हरवलेला बाँब शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले होते.
त्याबरोबर होतं1.1 मेगाटनचं वॉरहेड ज्यात ११ लाख टन एवढ्या स्फोटक क्षमतेचं TNT (trinitrotoluene - नावाचं रासायनिक स्फोटक )पेरलेलं होतं.
आणखी किती बाँब?
खरंतर पालोमेरेसची घटना ही काही अण्वस्त्र हरवण्याची एकमेव घटना नव्हे.
1950 पासून आतापर्यंत किमान 32 वेळा अशा प्रकारे अतिविद्ध्वंसक, विनाशकारी अण्वस्त्रांच्या बाबतीत 'नेम चुकण्याचा' प्रकार घडला असावा.
बहुतेक घटनांमध्ये अस्त्रं चुकून डागली गेली किंवा आणीबाणीच्या प्रसंगात विमानांतून फेकण्यात आली. ती नंतर सापडली देखील.
पण अमेरिकेचे दोन न्यूक्लिअर बाँब मात्र पूर्णपणे गायब आहेत. अगदी आजदेखील ते कुठल्याशा दलदलीत, महासागरात किंवा विस्तीर्ण माळरानातून दबा धरून बसले आहेत.
कॅलिफॉर्निया येथील जेम्स मार्टिन सेंटर फॉर नॉन प्रोलिफरेशन स्टडीजमधील पूर्व आशिया अण्वस्त्र प्रसार बंदी कार्यक्रमाचे संचालक असलेले जेफ्री लुईस सांगतात,
"आपल्याला ज्ञात आहेत त्या सगळ्या अमेरिकेतल्या घटना आहेत. 1980 च्या दशकात अमेरिकेच्या संरक्षण विभागाने तयार केलेली सगळ्या अस्त्रांची जंत्री जेव्हा जाहीर केली त्यावेळीच ही यादीसुद्धा बाहेर आली."
या सगळ्या घटना शीतयुद्धाच्या काळातील आहेत. त्या वेळी अमेरिका आणि सोविएट संघ यांच्यात म्युच्युअली अशुअर्ड डिस्ट्रक्शन म्हणजे MAD करार झाला होता.
म्हणजे कोणत्याही एका देशाने दुसऱ्या अण्वस्त्रधारी देशावर अण्वस्त्र हल्ला केला तर त्यालाही ही विनाशकारी अस्त्रं प्रत्युत्तरादाखल एकदाच वापरता येतील.
त्यानंतर दोन्ही देशांनी पूर्णपणे आपापली अण्वस्त्रं नष्ट करावीत असा त्याचा अर्थ.
या परस्पर खात्रीशीर विनाश कराराच्या सुईवर तोल राखत उभं राहण्यासाठी अमेरिकेने त्यांची अण्वस्त्रसज्ज लढाऊ विमानं कायम तैनात ठेवली होती.
1960 ते 1968च्या दरम्यान अण्वस्त्रसज्ज विमानं नेहमीच आकाशात घोंघावत राहिली होती. या मोहिमेला अमेरिकनांनी क्रोम डोम असं नाव दिलं होतं.
या गडबडीतच काही अपघात झाले आणि चुकीने अण्वस्त्र गहाळ झाली. पण नेमकी किती आणि कुठे?
"आमच्याकडे सगळा आकडा आहे, असं मला वाटत नाही", लुईस सांगतात.
कारण त्या वेळी कुठल्या देशाकडे किती अण्वस्त्र होती आणि युद्धसज्जतेत त्यांचं काय झालं हे माहीत नाही. यूके, फ्रान्स, रशिया आणि चीन कुणाचेच आकडे माहीत नाहीत. त्याबाबत माहिती बाहेर आलेली नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.
सोव्हिएत संघाचा अण्वस्त्रसज्जतेचा इतिहास तर खूपच काळा आहे. धूसर आहे. त्यांनी 1986 पर्यंत 45 हजार अण्वस्त्रं जमवली होती.
या देशाने अनेक अणुबाँब गहाळ केले जे पुन्हा कधीच सापडले नाहीत, हे जगजाहीर आहे.
पण अमेरिकेच्या घटनांमध्ये आणि सोव्हिएट संघाच्या घटनांमध्ये एक मूलभूत फरक आहे. रशियाचे सगळे बाँब खोल समुद्रात पडले. त्यामुळे ते परत मिळवणं शक्य नसलं तरी ते नेमके कुठे पडले याची माहिती आहे.
8 एप्रिल 1970 रोजी एका रशियन पाणबुडीतल्या एअर कंडिशन्ड सिस्टीमला आग लागली. बिस्केचा उपसागर किंवा स्पेनमध्ये जे बिस्केचं आखात नावाने ओळखलं जातं त्या समुद्रात सोव्हिएतची K-8 ही अण्वस्त्रधारी पाणबुडी अपघातग्रस्त झाली.
उत्तर अटलांटिक महासागरातील स्पेन आणि फ्रान्सच्या किनाऱ्याला लागून असलेल्या या बिस्के उपसागराचा भाग नेहमीच वादळी वाऱ्यांमुळे धोकादायक समजला जातो.
अनेक मोठमोठ्या जहाजांना याच समुद्रात जलसमाधी मिळाली आहे. रशियन पाणबुडी त्यातलीच एक. पण ती समुद्रतळाशी खोल खोल जात असताना तिच्यावर लादलेली 4 अण्वस्त्रंही किरणोत्सारी कार्गोसह समुद्रात बुडाली.
पण ही समुद्रात हरवलेली जहाजं किंवा पाणबुड्या कधीच एका ठिकाणी राहात नाहीत.
1968 मध्ये सोव्हिएतची K-129 ही पाणबुडी पॅसिफिक महासागरात हवाई बेटांच्या वायव्येला अचानक गायब झाली. त्यावर तीन अण्वस्त्रं लादलेली होती.
अमेरिकेला या बुडलेल्या अण्वस्त्रधारी पाणबुडीचा सुगावा लागला आणि त्यांनी ही अण्वस्त्र हस्तगत करण्यासाठी एक सिक्रेट मिशन सुरू केलं. "या बुडलेल्या पाणबुडीच्या शोधाची कथाही अगदी विलक्षण आहे", लुईस म्हणतात.
आपल्या विक्षिप्तपणासाठी प्रसिद्ध असलेल्या हावर्ड ह्यूज नावाच्या अमेरिकन अब्जाधीशाशी या कथेचा संबंध लावला जातो.
या ह्यूज यांचे अनेक व्यवसाय होते. अगदी हॉलिवूड सिनेमांच्या निर्मितीपासून दिग्दर्शक ते पायलट असे नाना उद्योग त्यांनी केले. त्यांना म्हणे खोल समुद्रात खाणकाम करण्यात (Deep sea mining)रस निर्माण झाला.
लुईस सांगतात, "खरं तर ते डीप सी मायनिंग नव्हतंच. समुद्रतळाशी पोहोचू शकेल असा एक प्रचंड मोठा क्लॉ किंवा पोलादी पंजा बांधण्याचा हा प्रयत्न होता. उद्देश हा की खोल समुद्रात बुडलेल्या त्या पाणबुडीला तो अलगद उचलून वर आणू शकेल."
याला प्रोजेक्ट अॅझोरिअन असं नाव दिलं होतं. पण दुर्दैवाने हा प्रकल्प यशस्वी झाला नाही. समुद्रतळातून उचलताना ती पाणबुडी मोडली.
"पाणबुडी मोडली, म्हणजे त्यातली अण्वस्त्रं पुन्हा समुद्रतळाशी जाऊन पडली", लुईस म्हणतात. आजही ती अण्वस्त्रं गंजलेल्या आवरणात तिथेच पडलेली असल्याचं काही जणांचं मत आहे. तर काही जण सांगतात की, ती अण्वस्त्रं नंतर सापडली.
अमेरिकेची हरवलेली अण्वस्त्रं सापडल्याच्या बातम्या सतत कुठून कुठून येत असतातच.
1998 मध्ये एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने आपल्या पत्नीसह अमेरिकेच्या किनाऱ्यालगत पडलेला एक बाँब शोधण्याचा ध्यास घेतला होता.
अमेरिकेत जॉर्जियातल्या टायबी आयलंडजवळ 1958 मध्ये चुकीने बाँब पडला होता. ज्या वैमानिकाच्या हातून हा बाँब हरवला होता किंवा पडला होता त्याचा इंटरव्ह्यूसुद्धा या पती-पत्नीने घेतला.
शिवाय बाँब पडल्याचं उघड झाल्यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी ज्या ज्या टीम आल्या त्यातील काही लोकांनाही ते भेटले आणि शेवटी अटलांटिक महासागराजवळच्या वासॉ साउंड नावाच्या उपसागरात तो बाँब पडला असावा असा निष्कर्ष त्यांनी काढला आणि त्याभोवती शोध सुरू केला.
आपल्या बोटीतून या जिगरबाज जोडीने हा परिसर अक्षरशः पिंजून काढला. बोटीला त्यांनी पाठीमागे एक गायगर काउंटर लावला होता. गायगर काउंटर हे एक छोटं मशीन असतं ज्यामध्ये किरणोत्सर्ग (Radioactive emission) मोजता येतो. समुद्रात कुठल्या ठिकाणी रेडिएशन अधिक येतं हे बघणं बाँबच्या शोधासाठी आवश्यक होतं.
आणि अखेर एक दिवस त्यांच्या गायगर काउंटरला आसपासच्या ठिकाणांपेक्षा दसपट अधिक रेडिएशन्स जाणवली. ही बाब त्यांनी कळवल्यानंतर सरकराने तातडीने त्यांची टीम शोधासाठी पाठवली.
पण, रेडिएन्शचं वाढलेलं प्रमाण समुद्रतळाच्या ठराविक मिनरल्समुळेच असल्याचं समोर आलं आणि हाही प्रयत्न फसला.
अखेर बाँबचा शोध लागलाच नाही. म्हणजे आता अमेरिकेचे तीन हायड्रोजन बाँब आणि सोव्हिएट रशियाची सर्वसामान्यांना अज्ञात असलेली अण्वस्त्रसंख्या समुद्राच्या पोटात गडप झालेली आहे.
अणुयुद्धाच्या धोक्याची आठवण करून देत ती अद्याप समुद्रतळाशी दडून राहिलेली असली तरी त्या अण्वस्त्रांचा आता विसर पडला आहे.
पण या अण्वस्त्रांपासून अद्याप धोका आहे का? हे बाँब पाण्यातच फुटण्याचा धोका असतो का? ही हरवलेली अण्वस्त्र अद्याप आपल्याला का सापडू शकली नाहीत? ती कधीच आपल्या हाती परत येणार नाहीत का? असे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेतच.
पांढऱ्या बुरख्यातलं भूत
त्या कथित गुप्त मोहिमेसाठी मेयर्स शेवटी स्पेनला पालोमेरेस गावात पोहोचले. याच गावात 1966 मध्ये B52 बाँबर पडले होते.
अद्याप तिथल्या प्रशासनाला हरवलेला अणुबाँब सापडला नव्हता. पालोमेरेसची टीम त्या छोट्या गावात थंडगार आणि दमट वातावरणात तंबूतच रात्र काढायची.
मेयर्स त्या दिवसांची आठवण काढताना सांगतात. "अगदी इंग्लंडच्या हिवाळ्यासारखं वातावरण होतं तिथे." दिवसा थोडंफार काम करायला संधी मिळत असे, पण सगळा वेळ प्रतीक्षा करण्यातच चालला होता.
"लष्करी सेवेत हे नेहमीचं आहे. निघायची घाईघाई आणि नंतर थंडपणे प्रतीक्षा", मेयर्स म्हणतात.
"आम्हाला इतक्या तातडीने तिथे नेलं होतं, पण तिथे पोहोचल्यावर पहिले दोन आठवडे आम्ही काहीच केलं नाही. त्यानंतर खऱ्या अर्थाने समुद्रतळाचा शोध त्यांनी गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली."
हे शोधकार्य सुरू असताना तिथल्या पथकाने दोन प्राचीन पण उपयुक्त संशोधनांचा आधार घ्यायचं ठरवलं.
एक होतं 18 व्या शतकातील एका हौशी गणितज्ञाने शोधलेलं एक फारसं प्रकाशात न आलेलं प्रमेय.
हा गणितज्ञ पेशाने प्रेसबिटेरियन मिनिस्टर(प्रॉटेस्टंट चर्चमधील एक पद)होता.
आधी घडलेली गोष्ट पुन्हा घडण्याची शक्यता किती हे तपासण्यासाठी लोक त्याच्या बेसियन इन्फरन्स या प्रमेयाचा वापर करायचे.
मेयर्सच्या बाँबशोधक पथकाने हेच प्रमेय वापरून शोधकार्य योग्य दिशेला जाईल आणि बाँब सापडण्याची शक्यता वाढेल यासाठी प्रयत्न केला.
या टीमने वापरलेलं दुसरं तंत्र म्हणजे अॅल्विन (Alvin). ही एक अत्याधुनिक पाणबुडी होती जी कितीही खोल पाण्यात जाऊ शकायची.
या पाणबुडीच्या पोटात बसून शोधकार्य करणारी माणसं भूमध्य समुद्राच्या निळाईत सूर मारायचे आणि हरवलेला बाँब कुठे दिसतोय का ते बघायचे.
1 मार्च 1966 रोजी समुद्रात डुबकी घेतलेल्या पाणबुडीतल्या माणसांना काहीतरी पांढरं दिसलं.
समुद्रतळाला बाँबने जेव्हा पहिला स्पर्श केला तेव्हाच्या खुणा सापडल्या. नंतर जे काही दिसलं ते मात्र भयाण होतं. पांढरा अंगरख्याखाली काहीतरी भुतासारखं तरंगताना आढळलं. अण्वस्त्रांचं ते गोलाकार टोक होतं. त्यावर भुतासारखं दिसणारं पांढरं पॅराशूट गुंडाळलं गेलं होतं.
विमानातून समुद्रात पडतानाच ते कार्गोपासून विलग झालं होतं आणि आता त्या कार्गोला अर्धवट गुंडाळलेल्या अवस्थेत दिसलं. धातूच्या ट्यूबला पांढऱ्या बुरख्याखाली किंवा चादरीखाली बघताना एखादं भूत दिसल्यासारखंच वाटलं.
बाँबची निशाणी सापडली असली तरी खरं काम अद्याप सुरूच झालेलं नव्हतं. आता मेयर्सचं काम होतं तो बाँब समुद्रतळापासून (जो २८५०फूट खोल होता)तो बाँब अलगद उचलून वर आणणं.
मग मासेमारीला वापरतात तसा गळ तयार करण्यात आला. पण अर्थातच हा गळ अधिक मजबूत आणि अर्थातच हजारो फूट लांबीचा नायलॉनचा दोर वापरून तयार केला होता. तळाशी धातूचा हूक केला होता.
त्याला अलगद अडकवून ती वस्तू जशीच्या तशी उचलून वर आणायची आणि मग पाणबुडे प्रत्यक्ष सूर मारून पोहोचू शकतील एवढ्या अंतरावर आल्यावर ती व्यवस्थित उचलूनच जमिनीवर आणायची असं ठरलं होतं.
"प्लॅन तर छान केला होता पण तो यशस्वी झाला नाही", मेयर्स सांगतात.
"आधीचं सगळं ठरवल्याप्रमाणे व्यवस्थित, काळजीपूर्वक आणि शांतपणे झालं. आम्ही सगळे वर वाट पाहात होतो की कधी एकदा ती वस्तू वर येते आणि आम्ही त्यानंतर काय करू शकतो याचा विचार सुरू झाला होता."
त्या शोधपथकाने ठरवल्याप्रमाणे गळाला बरोबर बाँब अडकवला. हळूहळू ते आता तो तळापासून उचलण्याचा प्रयत्न करत असतानाच अनपेक्षित धक्का बसला. त्याला गुंडाळलं गेलेलं पॅराशूट अचानक कार्यरत झालं.
पॅराशूट जे काम चोख करणं अपेक्षित आहे तेच करायला लागलं पण त्यामुळे या टीमचं काम दुरापास्त झालं.
पॅराशूटमुळे त्याला अडकलेला कार्गो आणि त्यावरचा बाँब यांचा वेग कमी झाला. सगळा समतोल बिघडला आणि मोहिम फत्ते होण्याच्या शेवटच्या मार्गावर असताना सगळंच अवघड होऊन बसलं.
मेयर्स त्याची आठवण देत विचारतात, "तुम्हाला माहिती आहे का, पॅराशूट पाण्यातही तसंच चालतं. तेच काम करतं जे जमिनीवर करतं."
शेवटी त्या पॅराशूटचा जोर भारी पडला. पॅराशूटसकट बाँब कार्गोला ओढळं अवघड झालं आणि अखेर गळाचा हूक निसटला.
गळाला लागलेला अणुबाँब सावकाश पुन्हा समुद्रतळाशी जाऊ लागला. या वेळी तो आणखी खोल ठिकाणाकडे सरकला, जिथून तो वर काढलं जवळपास अशक्य होतं. (नशीब बलवत्तर म्हणून त्या छोट्या आल्विनमधली माणसं पॅराशूटसारखी गुंडाळली गेली नाहीत, नाहीतर त्यांचाही शेवट त्या समुद्रतळाशी झाला असता. )
मेयर्स हतबल झाले. आजही ते आठवताना ते म्हणतात. "आम्ही भयंकर निराश झालो होतो."
आता बाँब आणखी खोलवर गेल्याने तो वर खेचणं अवघड झालं होतं. त्यांचा गळ तर यासाठी कुचकामी ठरला होता. मग बाँब शोधून वर काढण्याचं काम दुसऱ्या बोटीवर आणि दुसऱ्या टीमकडे सोपवलं गेलं.
जवळपास महिनाभर या नव्या टीमने बाँब वर काढण्याचं सुयोग्य तंत्र विकसित करण्यात घालवल्यानंतर त्यांचा प्लॅन तयार झाला. त्यांनी वेगळ्या प्रकारची रोबोटिक पाणबुडी यासाठी वापरायचं ठरवलं.
या पाणबुडीच्या बरोबर एक केबल कंट्रोल्ड गाडीच पाण्याखाली पाठवायची ठरली. यामध्ये त्या पॅराशूटसकट बाँब घालायचा आणि आहे तसा वर खेचायचा ठरला. यथावकाश हा प्लॅन यशस्वी झाला.
बाँबसकट ते मशीन समुद्रातून वर आलं. पण पुढचं काम आता अधिक बिकट झालं होतं. या सगळ्या गडबडीत तो बाँब त्याच्या कवचातून हलला होता. आता तो नेहमीच्या पद्धतीने नष्ट करणं शक्य नव्हतं.
त्याऐवजी त्या अधिकाऱ्यांना थेट तो कापावा लागणार होता. "कल्पना करा, हायड्रोजन बाँब चिरायचा किंवा त्याला मधोमध छिद्र पाडायचं... नुसतं ऐकतानाच किती भयंकर वाटतं नाही! पण त्यांनी हे काम पार पाडलं. त्यांची तशी तयारीच होती", मेयर्स सांगतात.
दलदलीतलं गूढ
दुर्दैवाने अमेरिकेचे जे तीन हायड्रोजन बाँब गायब झालेत ते शोधायच्या प्रयत्नांना या स्पॅनिश समुद्रातल्या प्रयत्नांसारखं यश अद्यापही आलेलं नाही.
पण या बाँबचा स्फोट होऊन उर्त्सजन होण्याचा धोका कमी असल्याचं मानलं जातं.
आता असं का मानलं जातं हे समजून घेण्यासाठी अणुबाँब कसा काम करतो हे आधी समजून घ्यावं लागेल.
सप्टेंबर 1905 मध्ये अल्बर्ट आइनस्टाइनने त्याच्या फाउंटनपेनमधून एक विलक्षण वैज्ञानिक कल्पना झरझर कागदावर उतरवली आणि पुढे ते जगातलं सगळ्यात प्रसिद्ध समीकरण ठरलं.
E= mc2 म्हणजेच पदार्थाचं वस्तुमान आणि प्रकाशाच्या वेगाचा वर्ग यांचा गुणाकार केल्यास उर्जेचं समीकरण साधतं. याचा दुसरा अर्थ असा की, जग ज्यापासून तयार झालं आहे तो प्रत्येक अणू उर्जेमध्ये परावर्तित करता येतो आणि याउलट उर्जाही अणूमध्ये आणता येऊ शकते.
ते कसं करायचं हे तुम्ही साधलंत तर त्यातून निघणारी उर्जा एवढी प्रभावी आणि ताकदीची असेल की, ती सूर्याला ताकद देणाऱ्या उर्जेच्या बरोबरीची होईल.
या समीकरणाच्या शोधानंतर 34 वर्षांनी आइनस्टाइनने अमेरिकेच्या तत्कालीन अध्यक्षांना - फ्रँकलिन रुझवेल्ट यांना पत्र लिहून सावध केलं की, आपली उर्जेची संकल्पना वापरून नाझी एक प्रभावी अस्त्र तयार करत आहेत. यापुढे काय झालं तो इतिहास आहे.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान पहिला अण्वस्त्राचा प्रयोग यशस्वी झाला ते मॅनहॅटन प्रोजेक्ट वेगाने काम करू लागलं आणि त्यांनी अणुबाँब तयार केला. 1945 मध्ये अमेरिकेने जगातला पहिला अणुबाँब डागला.
जपानच्या हिरोशिमावर आणि काही दिवसात नागासकीवर डागलेले बाँब हे खऱ्या अर्थाने मूळ अणुबाँब होते. यात अणुकेंद्रीय भंजन क्रिया (न्यूक्लिअर फिशन) होते.
यात जास्त अणुभार असलेल्या जड मूलद्रव्यावर किंवा रेडिओअॅक्टिव्ह एलिमेंटवर न्यूट्रॉन या मूलकणांचा मारा केला जातो. त्यामुळे त्या मूलद्रव्याच्या अणुकेंद्राचं भंजन होते आणि कमी अणुभार असलेली दोन हलकी मूलद्रव्यं निर्माण होतात.
परंत, या नवीन निर्माण झालेल्या मूलद्रव्यांचं एकत्रित वस्तुमान मूळच्या वस्तुमानापेक्षा कमी असतं आणि कमी झालेल्या त्या वस्तुमानाचं (आइन्स्टाइन यांच्या E = mc^2 या सूत्राप्रमाणे) उर्जेत रूपांतर होतं आणि आणखी न्यूट्रॉन तयार होतात.
पुन्हा अणुकेंद्राचं भंजन होत राहून ते पुन्हा हीच ऊर्जा अनियंत्रित पद्धतीने(चेन रिअॅक्शन) अणुस्फोटात मोकळी होते.
शास्त्रज्ञांनी सर्वांत पहिल्यांदा अणुबाँबची चाचणी केली होती तेव्हा ही चेन रिअॅक्शन थांबेल की नाही आणि कधी याबद्दल ते साशंक होते. जगाचा अंत होऊ शकेल एवढी शक्ती त्यात असते, अशी शक्यताही तेव्हा वर्तवली होती.
न्यूक्लिअर फिशनला सुरुवात व्हावी यासाठी अणुबाँब तयार करताना त्यामध्ये युरेनियम-235 सारखे किरणोत्सारी पदार्थ बंदुकीच्या गोळीसारखे ठासले जातात.
त्यांच्यापर्यंत आवश्यक उष्णता पोचावी म्हणजेच ते पेटावे म्हणून नेहमीची स्फोटकं वापरली जातात ज्यामुळे प्लुटोनियम-239 चे अणू संकुचित केले जातात किंवा आणखी युरेनियम वापरलं जातं.
या प्रक्रियेने मुख्य किरणोत्साही पदार्थापर्यंत पोहोचून न्यूट्रॉन्स पेट घेतात आणि फिशन चेन रिअॅक्शन म्हणजेच भंजन विक्रियेची साखळी सुरू होते.
नागासाकी आणि हिरोशिमामध्ये ही विद्ध्वंसक अणुस्फोटकं थेट जमिनीवर पडली. त्यामुळे शेकडो मैलांपर्यंत हादरे बसले आणि हजारो माणसं दगावली.
काही जे थेट बाँबच्या कक्षेत होते त्यांचा जिथल्या तिथे कोळसा झाला, किंबहुना वाफ झाली असं म्हणता येईल.
कारण या प्रक्रियेत उष्णताच तेवढी असते. काही जण किरणोत्सारामुळे जळून मरण पावले. बरीच माणसं प्रत्यक्ष स्फोटानंतर काही दिवस, काही महिने आणि पुढची काही वर्षंदेखील किरणोत्सर्गाच्या परिणामामुळे दुर्धर आजारी झाली आणि मृत्युमुखी पडली.
अण्वस्त्रांची पुढची आवृत्ती आणखी शक्तिशाली आणि संहारक स्वरूपाची होती. 1950 आणि 60 च्या दशकांमध्ये जगात जी अण्वस्त्र गायब झाली ती बहुतेक याच प्रकारची होती.
सोव्हिएत रशियाने चाचणी केलेला एक बाँब 57 मेगाटन्सपर्यंत पोहोचला होता. अमेरिकेने 1950च्या दशकात बिकिनी अटॉल इथे केलेली अण्वस्त्र चाचणी 15 मेगाटन्सची होती. हे होते थर्मोन्यूक्लिअर किंवा हायड्रोजन बाँब.
हायड्रोजन बाँबला तांत्रिक मराठी भाषेत अणुकेंद्रीय संघटन बाँब किंवा ऊष्मीय अणुकेंद्रीय बाँब (थर्मोन्यूक्लिअर) असं म्हटलं जातं.
यातील विक्रिया अणुकेंद्रीय भंजनाच्या बरोबर उलटी असते. प्रथम नेहमीच्या भंजन म्हणजे फिशन प्रक्रियेतून मोठ्या प्रमाणावर ऊर्जा निर्माण होते. ती दुसऱ्या स्तरातल्या ड्यूटेरियम आणि ट्रिटियम या हायड्रोजनच्या समस्थानिकांपर्यंत (isotopes of hydrogen ) पोहोचते.
हायड्रोजनामध्ये फक्त एक प्रोटॉन असतो, तर ड्यूटेरियममध्ये प्रोटॉनाबरोबर एक न्यूट्रॉन असतो आणि ट्रिटियममध्ये एक प्रोटॉन व दोन न्यूट्रॉन असतात. त्यामुळे आणखी प्रचंड ऊर्जा उत्सर्जित होते आणि ते फुटतात तेव्हा हिलियम आणि फ्री न्यूट्रॉनची निर्मिती होते.
ही प्रक्रिया प्रचंड धोकादायक असल्याने हायड्रोजन बाँब तयार करताना अपघात टाळण्यासाठी अनेक गोष्टींची काळजी घेतली जाते.
वासॉ साउंडच्या समुद्रात दलदलीत कुठे अडकून पडलेल्या टायबी आयलंड बाँबची केस आता बघू या.
5 फेब्रुवारी 1958 रोजी 3400 किलोचे अण्वस्त्र (हायड्रोजन बाँब)B-47 बाँबरवर लोड केलं गेलं. दुसरं एक B-47 लढाऊ विमानसुद्धा या लाँग ट्रेनिंग मिशनचा भाग म्हणून त्याच वेळी उडवण्यात आलं.
सोव्हिएट संघावर कल्पित हल्ला करण्याच्या सरावाचा हा भाग होता. या रंगीत तालमीसाठी रशियातल्या मॉस्कोच्या ऐवजी अमेरिकेतल्या व्हर्जिनिया प्रांतातल्या रॅडफोर्ड शहरावर 'प्रयोग' करायचं ठरलं.
प्रचंड जड अण्वस्त्रांसह तासनतास आकाशात उडत राहायचं आणि नियोजित स्थळी ठरलेल्या वेळी हल्ला करण्याचा सराव वैमानिकांना व्हावा यासाठीचा हा उद्योग होता.
दोन्ही विमानांचे पायलट फ्लोरिडातल्या तळावरून उड्डाण करून एकमेकांचे मार्ग छेदत टारगेटकडे म्हणजे रॅडफोर्डकडे निघाले.
सगळा सराव नियोजनाप्रमाणे झाला. ते वैमानिक आपल्या तळाकडे परत येत असतानाच आक्रित घडलं.
दक्षिण कॅलिफॉर्नियात त्याच वेळी एक दुसरा युद्धसराव सुरू होता. त्यातली काही लढाऊ विमानं या B-47 च्यामध्ये आली. त्यांच्या नियोजनात हे B-47 पाडायचा प्लॅन होता. अर्थात सराव म्हणून.
पण त्यांना दुसरं अण्वस्त्रधारी B-47 दिसलं नाही आणि त्यांच्या सरावात नेमकं अण्वस्त्रधारी विमानच क्रॅश झालं.
त्या विमानाच्या वैमानिकाने न्यूक्लिअर बाँब पाण्यात फेकून मग इमर्जन्सी लँडिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतला.
तायबी बेटाजवळ 30 हजार फुटांवरून बाँब पाण्यात फेकण्यात आला. या आदळण्यानेसुद्धा बाँबस्फोट झाला नाही हे विशेष.
आतापर्यंत अपघात झालेल्या किंवा सरावादरम्यान नेम चुकलेल्या 32 अण्वस्त्रांपैकी कुठल्याच अस्त्राचा विस्फोट झालेला नाही. दोन घटनांमध्ये किरणोत्सारी पदार्थ मात्र आसपास पसरले होते.
हे होऊ शकलं कारण या सगळ्या सरावांदरम्यान मूळ अस्त्रापासून भंजनक्रियेसाठी आवश्यक अण्विक पदार्थ (Nuclear material)विलग ठेवण्यात आलेले होते.
प्लुटोनियमची गोळी किंवा टिप अण्वस्त्र डागण्याच्या अगदी शेवटच्या क्षणी लक्ष्य समोर आल्यावरच त्या अस्त्राला जोडली जाईल अशी व्यवस्था होती.
त्यामुळे ही अण्वस्त्रं पडली तेव्हा नेहमीची स्फोटकं असली तरी अणुस्फोटासाठी आवश्यक उष्णता निर्माण होऊ शकली नाही. कारण किरणोत्सारी पदार्थ (Radioactive material)पुरेसे गरम झालेच नाहीत. त्यामुळेच पुढचा विनाश टळला.
लुईस हेही लक्षात आणून देतात की, टायबी आयलंडचा बाँब आकाशातून थेट समुद्राच्या पाण्यावर आदळला. त्यामुळे दणका कमी प्रमाणात बसला.
हाच दणका जमिनीवर आदळला असता तर भयंकर अवस्था झाली असती. याच कारणासाठी अवकाशयानसुद्धा थेट जमिनीवर उतरण्याऐवजी स्प्लॅशडाउन लँडिंग करण्याला प्राधान्य देतात त्यामागे हेच कारण आहे.
पुढच्या आवृत्तीच्या बाँबमध्ये तर 'वन पॉइंट सेफ्टी' काही आणखी सुरक्षा वैशिष्ट्यं आणली गेली. म्हणजे हायड्रोजन बाँबची स्फोटकं जरी प्रज्वलित झाली तरी प्रत्यक्ष अणुभंजन प्रक्रिया नियंत्रित करता येणं शक्य झालं.
लुईस सांगतात त्याप्रमाणे जर तुमचा बाँब तुमच्या लक्ष्याव्यतिरिक्त कुठे पडला तर प्लुटोनियम बाहेर पडावं, त्याच्यापर्यंत स्फोटाची उष्णता पोहोचू नये यासाठीची सुरक्षा केली गेली.
एवढी सगळी सुरक्षा व्यवस्था असूनही दरवेळी ती सगळी काम करतील असं नाही. 1961मध्ये अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना राज्यात गोल्ड्सबोरो भागावरून उडताना B-52 हे लढाऊ विमान मोडलं.
त्यामध्ये असलेली दोन अण्वस्त्र त्यामुळे टाकून द्यावी लागली. त्यातलं एक पॅराशूटला लावलेलं असल्याने व्यवस्थितपणे जमिनीवर उतरलं पण दुसऱ्या अण्वस्त्राच्या चारातली तीन सुरक्षा कवचं निकामी ठरली असल्याचं लक्षात आलं.
1963 सालची अमेरिकन संरक्षण मंत्रालयाची कागदपत्रं जनतेसमोर उघड झाली तेव्हा तत्कालीन अमेरिकन संरक्षण मंत्र्यांनी या घटनेची नोंद काय केली होती ते कळलं.
"अगदी थोडक्यात, म्हणजे अक्षरशः दोन तारा जोडल्या गेल्या नाहीत म्हणून केवळ अणुस्फोट टळला."
विमानातून पडलेला दुसरा अणुबाँब जमिनीवर आदळला तेव्हा फुटून तुकडे झाले आणि एका शेतात विखुरले. बहुतेक तुकडे सापडले पण नेमका युरेनियम असलेला एक तुकडा मात्र 50 फूट खोल दलदलीत अडकून राहिला.
अमेरिकन हवाई दलाने मग या परिसरातली सगळी जमीन विकत घेतली. लोकांनी या ठिकाणी कुठलंही खोदकाम करू नये या उद्देश होता.
काही घटना तर इतक्या अतर्क्य वाटतात की, त्या कपोलकल्पित असाव्यात असा संशय यावा. असाच एक अशक्य वाटणारा प्रसंग अमेरिकन लढाऊ नौकेच्या युद्धसरावासंदर्भात सांगितला जातो.
USS Ticonderoga ही अमेरिकी नौसेनेतली प्रसिद्ध लढाऊ नौका. 1965 साली A4E स्कायहॉक हे विमान त्यावरून उडणार होतं. B-43 हे अण्वस्त्र घेऊन हे विमान सरावासाठी उडणार होतं. ते नौकेवर चढवलं जात असतानाच डेकवरच्या क्रूच्या लक्षात आलं विमान घसरतंय.
त्यांनी लगेच पायलटला हात हलवून ब्रेक दाबायची सूचना केली. पण पायलटने ती पाहिली नाही. विमानातला एक तरुण लेफ्टनंट आणि अण्वस्त्रासह संपूर्ण विमान फिलिपिनी समुद्रात गडप झालं. जपानी बेटाजवळ अजूनही 16 हजार फूट खोल पाण्यात ते अजूनही आहे असं सांगतात.
गोंधळाचं चित्र
आता अपघाताबद्दलची अधिकृत कागदपत्रं आणि प्रत्यक्ष घटनाक्रम वेगवेगळा असू शकतो हे सांगणारं हे एक गोंधळाचं चित्र पाहा.
16 एप्रिल 1958 रोजी टायबी आयलंडचा बाँब समुद्रात हरवला असं दहा आठवडे चाललेल्या शोधकार्यानंतर जाहीर करण्यात आलं होतं.
ज्या पायलटने तो बाँब पाण्यात फेकला त्याने लिहिलेल्या अहवालात त्या अस्त्राला कॅप्शुल नसल्याचं नमूद केलं. सरावादरम्यान ती गोळी लावली गेली नाही, असंही त्यानं सांगितलं.
पण काही लोकांचा यावर विश्वास नाही. ते वेगळीच चिंता व्यक्त करतात.
1966 मध्ये संरक्षण मंत्र्यांच्या तत्कालीन साहाय्यकांनी लिहिलेल्या पत्रात तो बाँब Complete होता असा शब्द वापरला आहे. याचा अर्थ त्यावर प्लुटोनियमची गोळी चढवलेली होती.
जर हे खरं असेल तर Mark15 हा हायड्रोजन बाँब अजूनही विध्वंसक स्फोट घडवण्याची क्षमता राखून आहे असा त्याचा अर्थ होतो.
सध्या तो बाँब समुद्रतळाशी 5 ते 15 फुटांच्या दलदलीत अडकलेला आहे, असं सांगितलं जातं.
2011 मध्ये या अण्वस्त्रासंदर्भात फायनल रिपोर्ट एअरफोर्स न्यूक्लिअर वेपन्स अँड काउंटरप्रोलिफरेशन एजन्सीने सादर केला.
त्यात त्यांनी म्हटलं आहे की, 'या बाँबमधली नेहमीची स्फोटकं अजून शाबूत असतील तर हा बाँब अजूनही आसपासच्या पर्यावरणावर आणि माणसांवर विद्ध्वंसक परिणाम करणारा स्फोट घडवून आणू शकतो.
त्यामुळे कुठल्याही प्रकारे त्याला हात न लावणे, अगदी शोधण्या